एक्स्प्लोर

Samay Raina and Balraj Singh Ghai: अख्ख्या जगाने तोंड फिरवलं पण पडत्या काळात समय रैनाच्या पाठी मित्र खंबीरपणे उभा राहिला, कोण आहे बलराज सिंह घई?

Who Is Samay rainas Friend Balraj Singh Ghai: समय रैनाचा खास मित्र बलराज सिंह घई नेमका आहे तरी कोण? सोशल मीडियात त्याचीच चर्चा.

Who Is Balraj Singh Ghai Friend Of Samay Raina: कॉमेडियन समय रैना (Samay Raina) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण चर्चेत येण्यामागचं कारण 14 महिन्यांपूर्वीचं  प्रकरण नसून,  त्यानं अलिकडेच शेअर केलेला व्हिडीओ आहे. 'स्टिल अलाइव्ह' या व्हिडीओमुळे समय पुन्हा एकदा ट्रेन्डिंगवर आला आहे.  या व्हिडीओत त्यानं 14 महिन्यांत नेमकं काय काय घडलं? याची आपल्या शैलीत माहिती दिली.  या व्हिडीओत त्यानं वारंवार एका मित्राचा उल्लेख केला. समय रैनाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती  म्हणजे बलराज सिंह घई (Balraj Singh Ghai). मित्र वणव्यात गारव्यासारखा असतो, असं त्याच्या व्हिडीओतून स्पष्ट झालं. यावरुन आयुष्यात बलराजसारखा मित्र हवा, असं अनेकांना वाटलं असेल.  दरम्यान, बलराज सिंह नेमका आहे तरी कोण? समय रैना आणि बलराज यांच्यातील बॉण्डिंग कशी वाढली?  असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.  

बलराज नेमका आहे तरी कोण? (Samay Rainas Friend Balraj Singh Ghai)

बलराजचं पूर्ण नाव बलराज सिंह घई असं आहे. 'द हॅबिटॅट' या ठिकाणी समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोचे चित्रीकरण सुरु होते, ते ठिकाण बलराजच्या मालकिचे आहे.  'द हॅबिटॅट' हा स्टूडिओ मुंबईत उपस्थित आहे.  माहितीनुसार, बलराज हा परमजीत सिंह घई यांचा मुलगा असून,  ते युनिकॉन्टिनेंटल हॉटेल्सच्या व्यवसायात कार्यरत आहेत. आतापर्यंत समय आणि बलराजने आपल्या मैत्रीविषयी कधीही कॅमेऱ्यासमोर उघडपणे चर्चा केलेली नाही.   परंतु, रेडिटमध्ये केलेल्या दाव्यानुसार, दोघांमध्ये पूर्वीपासून मैत्री आहे.  

एकानं रेडिटवर लिहिले की, जेव्हा समय आपल्या करिअरची सुरुवात करत होता,   तेव्हा  बलराजने बऱ्याचदा  त्याला कार्यक्रमांसाठी  त्याचे 'द हॅबिटॅट' हे ठिकाण विनामूल्य दिले होते. हळूहळू त्यांच्यातील प्रोफेशनल बॉण्डिंग एका अतुट मैत्रीत रुपांतरित झाली.   समयने आपल्या 'स्टिल अलाइव्ह' या शोमध्ये  सांगितले की, 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमुळे झालेल्या वादाच्यावेळी मी बलराजसोबत यूएसमध्ये होतो. बलराजच्या बायकोनं एक व्हिडीओ पाठवला होता.  या व्हिडीओत  बलराजचे आई वडील हे तरुण पोलीस अधिकाऱ्यांच्या पाया पडत होते.   आम्हाला जाऊ द्या, आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही, अशी विनवणी करत होते',  असं समय म्हणाला.

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दु:ख अडवायला उंबऱ्यासारखा (Balraj Singh Information)

वाद आणि अडचणी असूनही बलराजने कधीही समयची साथ सोडलेली नाही. त्यानं शेवटपर्यंत, भारतात येईपर्यंत समयची साथ दिली.   समय आणि बलराज दोघेही लवकरच  'इंडियाज गॉट लेटेंट' चा दुसरा सिझन घेऊन येत आहेत. व्हिडीओच्या शेवटपर्यंत  समय  बलराजच्या मैत्रीबद्दल सांगत होता.  बलराजचे हेच गुण कौतुकास्पद आहे, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. यातून असे दिसून येते की,  बलराज सिंह हा केवळ  समयचा एक मित्र नसून,  जेव्हा संपूर्ण जग त्याच्या विरोधात होते,  तेव्हा तो समयच्या पाठीशी उभा होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'बिग बॉस मराठी 6' अंतिम टप्प्यात, या आठवड्यात कोण बाद होणार? विशाल की...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Thalapathy Vijays Jana Nayagan: विजय थलपतीच्या 'जन नायगन'चा 11व्या दिवशीही बोलबाला; रविवारी कोटींच्या घरात कमाई, प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी
विजय थलपतीच्या 'जन नायगन'चा 11व्या दिवशीही बोलबाला; रविवारी कोटींच्या घरात कमाई, प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी
Ranbir Kapoor Ramayan Memes: 'मैं उडना चाहता हूँ नैना...', 'रामायण'मधील रणबीर कपूरचा लूक पाहून नेटकऱ्यांच्या मीम्सचा पाऊस; श्रीरामापासून रावणापर्यंत कोणालाच सोडलं नाही
'मैं उडना चाहता हूँ नैना...', 'रामायण'मधील रणबीर कपूरचा लूक पाहून नेटकऱ्यांच्या मीम्सचा पाऊस; श्रीरामापासून रावणापर्यंत कोणालाच सोडलं नाही
Poetess Shanta Shelke House Collapsed: कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
Kangana Ranaut Slams Hrithik Roshan: 'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...
'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Embed widget