Viral Video : दिशा पटानीबरोबर डेव्हिड वॉर्नरने केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल
Viral Video : अलिकडेच ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
![Viral Video : दिशा पटानीबरोबर डेव्हिड वॉर्नरने केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल Viral Video david warner dance with disha patani as salman khan video viral Viral Video : दिशा पटानीबरोबर डेव्हिड वॉर्नरने केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/10/1ef95427a482d35aa24db8c2274b4c55_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Viral Video : सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग गाणी आणि चित्रपटातील संवादांवर रिल्स बनवण्याचा ट्रेंड जोरात आहे. दररोज जगभरातील कंटेंट क्रिएटर्स लिप-सिंक व्हिडीओ आणि डान्स व्हिडीओ बनवताना दिसतात. याच व्हिडीओला नेटकऱ्यांची भरपूर पसंती मिळते. सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
डेव्हिड वॉर्नर अनेकदा बॉलिवूड तसेच टॉलिवूड गाण्यांवर त्याच्या लिप-सिंक आणि डान्स व्हिडिओसह त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतो. त्याच्या अनेक व्हिडिओमध्ये त्याची पत्नी आणि मुलेही दिसतात. सध्या वॉर्नर अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटातील डायलॉगसह गाण्यावर डान्स करताना दिसला. त्याच वेळी, आता त्याने सोशल मीडियावर आणखी एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.
View this post on Instagram
ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने पुन्हा एकदा डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी तो सलमान खानच्या 'सीटी मार' या हिट गाण्याची हुक स्टेप करताना दिसला. वॉर्नरने हा एडिट केलेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. राधे चित्रपटातील त्याने शेअर केलेल्या नवीन व्हिडीओमध्ये सलमान खानच्या चेहऱ्यावर वॉर्नरचा चेहरा मॉर्फ करण्यात आला आहे.
सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला 21 लाख 60 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर यूजर्स सतत वॉर्नरचे कौतुक करताना दिसतात.
महत्वाच्या बातम्या :
- Sonu Sood : 'उन्हाळ्यात थंड बिअर नाही देणार?'; नेटकऱ्याचा अजब सवाल, सोनू सूदचं भन्नाट उत्तर
- Aathva Rang Premacha : सप्तरंगी प्रेमाचा नवा रंग घेऊन येतेय रिंकू राजगुरू, 'आठवा रंग प्रेमाचा' लवकरच होणार प्रदर्शित
- Ranbir-Alia Wedding : ना 14 ना 17 एप्रिल... 'या' दिवशी आलिया-रणबीर घेणार सात फेरे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)