Vicky Kaushal Praises Marathi Drama: 'पुढचे शो हाऊसफुल्ल व्हावेत, हीच शुभेच्छा', विक्की कौशलकडून रंगभूमीवर गाजत असलेल्या मराठी नाटकाचं तोंड भरुन कौतुक
Vicky Kaushal Praises Marathi Drama: बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलकडून मराठी नाटकाचं तोंड भरुन कौतुक. पुढचे सर्व शो हाऊसफुल्ल होण्यासाठी दिल्या शुभेच्छा.

Vicky Kaushal Praises Marathi Drama: सध्या मराठी नाटकांना (Marathi Theatre Play) सुगीचे दिवस आलेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मराठी नाट्यगृहांच्या (Marathi Theatre) बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या 'देवबाभळी'सारखं संगीत नाटक (Sangeet Devbabhali) रंगभूमी गाजवतंय. तर, सखाराम बाईंडरसारखं (Sakharam Binder) नाटक पुन्हा एकदा रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज आहे. अशातच सध्या एका नाटकाची जबरदस्त चर्चा रंगली आहे. ते नाटक म्हणजे, 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला'. सध्या हे नाटक रंगभूमीवर धुमाकूळ घालतंय. प्रेक्षकांकडूनही या नाटकाला भरभरून प्रतिसाद मिळतोय. अशातच आता विक्की कौशलनंही (Bollywood Actor Vicky Kaushal) या नाटकाचं भरभरून कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे, विक्की कौशलनं (Vicky Kaushal) मराठीतून संवाद साधत या नाटकाला शुभेच्छा दिल्या आहेत.
विक्की कौशल काय म्हणाला?
सध्या सोशल मीडियावर विक्की कौशलचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विक्की कौशल एका मराठी नाटकाचं तोंड भरून कौतुक करत असल्याचं पाहायला मिळत आहे. विक्की कौशल म्हणतो की, "नमस्कार! मी विकी कौशल... शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देतो. तुमचं काम, तुमची मेहनत आणि तुमचा प्रयत्न की, आपल्या महाराजांचा विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचावा, ही खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. पुढचे शो हाऊसफुल्ल व्हावेत, हीच शुभेच्छा. जय भवानी, जय शिवराय!"
View this post on Instagram
समाजाचे डोळे उघडणारं नाटक
वेगळ्या धाटणीचा विषय घेऊन रंगभूमीवर गाजत असलेलं 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' हे मराठमोळ्या नाटकावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. या नाटकातून छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आणि मानवतेसाठीच्या त्यांच्या संघर्षाचं चित्रण करण्यात आलं आहे. पण, छत्रपती शिवरायांचा संघर्ष कोणत्याही विशिष्ट जाती, धर्म किंवा समुदायासाठी नसून सर्व कष्टकरी लोकांसाठी होता, हे पटवून देणारं हे नाटक डोळं उघडतं.
नाटकाबाबत थोडसं...
'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' हे नाटक सध्या रंगभूमीवर प्रचंड गाजत आहे. तसं पाहिलं तर हे नाटक काही नवीन नाही. काही वर्षांपूर्वीच हे नाटक रंगभूमीवर आलं होतं. पण, काही कारणास्तव हे नाटक बंद करण्यात आलं होतं. आता कित्येक वर्षांनी पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आलं असून पुन्हा नाटकाचे प्रयोग सुरू करण्यात आले आहेत. या नाटकाचं लेखन राजकुमार तांगडे यांनी केलंय, तर दिग्दर्शन कैलाश वाघमारे, संभाजी तांगडे यांनी केलंय. महत्त्वाची बाब म्हणजे, या नाटकाची मूळ संकल्पना लोकशाहीर संभाजी भगत यांची असून त्यांनीच नाटकातील गाणी आणि संगीताची जबाबदारी सांभाळली आहे. सध्या हे नाटक रंगभूमीवर प्रचंड गाजत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अशी ही बनवाबनवी चित्रपटातील 'सुधा'चे Gemini ट्रेंडमधील फोटो पाहून प्रेमातच पडाल























