एक्स्प्लोर

Chhaava Movie Song Writer Kshitij Patwardhan: 'छावा'मधल्या 'आया रे तुफान'साठी मराठमोळ्या गायकाचं 'शब्दरुपी योगदान'; म्हणाला...

Chhaava Movie Song Writer Kshitij Patwardhan: 'आया रे तुफान' हे गाणं ऑस्कर विनिंग संगितकार ए. आर. रेहमान आणि मराठमोळी गायिका वैशाली सामंत यांनी गायलं आहे. तसेच, या गाण्यासाठी क्षितिज पटवर्धन या मराठमोळ्या लेखकानं आपलं शब्दरुपी योगदान या गाण्यासाठी दिलं आहे.

Vicky Kaushal Chhaava Movie Song Writer Kshitij Patwardhan: विक्की कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), अक्षय खन्ना (Akshaye Khanna) यांच्या मुख्य भूमिका असलेला आणि लक्ष्मण उतेकर (Director Laxman Utekar) दिग्दर्शित 'छावा' (Chhaava Movie) सिनेमाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) आयुष्याची आणि दैदिप्यमान पराक्रमाची ख्याती रुपेरी पडद्यावर मांडणारा 'छावा' येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. अशातच नुकतंच निर्मात्यांनी या चित्रपटातील नवं गाणं रिलीज केलं आहे. सध्या या चित्रपटातील नव्या गाण्याची चर्चा होत आहे. 'छावा'मधील 'आया रे तुफान' हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गाणं रिलीज होताच, प्रेक्षकांकडून लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव या गाण्यावर करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे, ऑस्कर विनिंग संगितकार ए. आर. रेहमान यांनी या गाण्याच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.

'आया रे तुफान' (Aaya Re Toofan) हे गाणं ऑस्कर विनिंग संगितकार ए. आर. रेहमान (A. R. Rahman) आणि मराठमोळी गायिका वैशाली सामंत (Vaishali Samant) यांनी गायलं आहे. तसेच, या गाण्यासाठी आणखी एका मराठमोळ्या व्यक्तीनं मोलाचं योगदान दिलं आहे. क्षितिज पटवर्धन (Kshitij Patwardhan) या मराठमोळ्या लेखकानं आपलं शब्दरुपी योगदान या गाण्यासाठी दिलं आहे. आता क्षितिजने 'आया रे तुफान'च्या निमित्ताने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लेखकाने खास पोस्ट शेअर करत दिग्गज संगीतकार ए आर रेहमान यांच्याबरोबर पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळाल्याने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Kshitij Patwardhan (@kshitijpatwardhan)

क्षितिज पटवर्धननं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये काय म्हटलं? 

क्षितिज पटवर्धननं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय की, "छावा'च्या 'आया रे तुफान'च्या निमित्ताने… आयुष्यात कृतकृत्य झाल्याचा अनुभव मला "माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रे" गाण्याला मिळत असलेल्या प्रेमानं येत असतानाच, छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगणार गाणं लिहायची जबाबदारी आली आणि वाटलं आपण खरंच भाग्यवान आहोत की, आपल्याला दोन्ही राजांची शब्दरूपी सेवा करता आली."

"ए. आर. रेहमान सरांसह या निमित्ताने पहिल्यांदाच काम केलं. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सर, निर्माते दिनेश विजन सर, हे गाणं ज्यांच्या बरोबर लिहायचं भाग्य लाभलं ते इर्शाद कामिल सर, या सगळ्यांचा आजन्म ऋणी आहे. आपली लाडकी गायिका वैशाली सामंत हिने हे गाणं गायलं आहे. 'छावा' मराठी मातीने देशाला दिलेली आणखी एक अनमोल देणगी ठरावी, ह्या सदिच्छेसह गाणं सादर करतोय 'आया रे तूफान!" 

"भगवे कि शान में चमका आसमान, आया आया आया रे तूफान! एक आंख में पानी, एक में अरमान, आया आया आया रे तूफान!" – क्षितिज

'छावा' 14 फेब्रुवारीला भेटीला... 

'छावा' चित्रपटात विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर, महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत दाक्षिणात्य लेडी सुपरस्टार रश्मिका मंदाना दिसणार आहे. तर, मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्ना साकारणार आहे. 

पाहा 'आया रे तुफान' (Aaya Re Toofan) गाणं : 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Vicky Kaushal, Akshaye Khanna First Meet: ना एकमेकांना भेटले, ना बोलले; थेट छत्रपती संभाजी महाराज अन् औरंगजेब म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकले, 'छावा'च्या सेटवर नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 March 2025Gadchiroli Honey Bee : मधमाशांशी फ्रेंडशिप, घरात 8-10 पोळं, मधमाशांसोबत राहणारं कुटुंबNagpur Rada Update : दंगलीत सहभागी होण्यासाठीच आले होते 'ते' 24 आरोपी दंगलग्रस्त भागातले नाहीचRSS : विश्व हिंदू परिषदेचे आठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलिसांना शरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...
तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...
60 वर्षाचा आमिर करणार तिसऱ्यांदा लग्न!
60 वर्षाचा आमिर करणार तिसऱ्यांदा लग्न!
Embed widget