Meena Ganesh Passed Away: सिनेसृष्टीवर शोककळा; दिग्गज अभिनेत्री मीना गणेश यांचं निधन, 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Meena Ganesh Passed Away: मीना गणेश यांच्यावर शोरनूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 1976 पासून ज्येष्ठ कलाकार मीना गणेश मोठ्या पडद्यासह छोट्या पडद्यावर सतत सक्रिय होत्या.
Malayalam actress Meena Ganesh Passed Away: चित्रपट आणि मालिकांमध्ये अनेक भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या मल्याळम अभिनेत्री मीना गणेश (Meena Ganesh) यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रपट आणि मालिकांमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका मीना गणेश यांनी साकारल्या आहेत. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या कारणास्तव त्यांच्यावर शोरनूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 1976 पासून त्यांनी इंडस्ट्रीमध्ये अनेक कामं केली. वृद्धापकाळानं त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे.
मीना गणेश यांच्यावर शोरनूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 1976 पासून ज्येष्ठ कलाकार मीना गणेश मोठ्या पडद्यासह छोट्या पडद्यावर सतत सक्रिय होत्या. त्यांच्या आठवणीत राहणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हणजे, वासंथियम लक्ष्मीयम पिन्ने नजानुम. या चित्रपटात त्यांनी आईची भूमिका साकारली होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनेत्री मीना गणेश गेल्या दोन वर्षांपासून अभिनयापासून दुरावल्या गेल्या होत्या.
SL पुरम सूर्या सोमा, कायमकुलम केरळ थिएटर आणि थ्रिसूर चिन्मयी यांसारख्या प्रसिद्ध नाटकांमध्ये अभिनय करून स्वतःला सिद्ध केलं होतं. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. वयाच्या 19व्या वर्षी पहिल्यांदा त्यांनी स्टेजवर पाऊल ठेवलं, त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. पक्षाघाताचा झटका आल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मीना या प्रसिद्ध अभिनेते, नाटककार ए.एन. गणेश यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्च्यात दिग्दर्शक मनोज गणेश आणि संगीता ही दोन मुलं आहेत. तर
मीना गणेश यांनी वयाच्या 19 व्या वर्षी त्यांच्या पहिल्या स्टेज प्लेने अभिनयाला सुरुवात केली आणि पी.ए. बायकर येथील मनिमुझक्कम येथे त्यांचे निधन झाले. पक्षाघाताचा झटका आल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मीना हा अभिनेता आणि नाटककार ए.एन. यांचा मुलगा आहे. ती गणेशची पत्नी होती. त्यांची मुले दिग्दर्शक मनोज गणेश आणि संगीता आणि त्यांच्या सून बिंदू मनोज आणि संगीता उन्नीकृष्णन आहेत. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी शोरनूर येथील शांती थेराम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बिंदु मनोज आणि संगीता उन्नीकृष्णन या दोन सुना आहेत. त्यांच्यावर आज संध्याकाळी शोरानूर इथल्या शांति थीरममध्ये अंत्यसंस्कार केले जातील.