एक्स्प्लोर

Vaibhav Mangale Post On Suman Kalyanpur: 'सुमनताई लताबाईंसारखं गायच्या, हेच त्यांचं दुर्भाग्य होतं...'; सुमन कल्याणपूरांच्या निधनानंतर वैभव मांगले यांची पोस्ट व्हायरल

Vaibhav Mangale Post On Suman Kalyanpur: सुरुवातीचा काही काळ सुमनताई लता बाईंसारखच गात होत्या… अनेक अशी उदाहरणं आहेत, ज्यात पटकन सांगता येत नाही की, लताबाई की सुमनताई गातायत, असं वैभव मांगले यांनी म्हटलंय. 

Vaibhav Mangale Post On Suman Kalyanpur: आपल्या मधुर आणि सुश्राव्य आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला. भारतीय सिनेसृष्टीत 700 हून अधिक गाण्यांना त्यांनी आवाज दिला. वयाच्या 89 व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 

मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट (Hindi Film) संगीतात त्यांनी दिलेले योगदान कधीही न विसरता येणारं आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारनं 2023 साली त्यांना 'पद्मभूषण' या नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. मराठी, बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा वेगवेगळ्या भाषांतील गाणी त्यांनी गायली. सुमनताईं लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि आशा भोसले (Asha Bhosle) यांच्याच काळात नावारुपाला आलेल्या. एवढ्या दिग्गज गायिका आधीच सिनेसृष्टीत काम करत असताना सुमनताईंनी आपल्या आवाजानं अनेकांची मनं जिंकली. अशातच मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी सुमन कल्याणपूर यांच्यासाठी एक पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये त्यांनी सुमनताईंचं एक अजरामर गीतही गायलं आहे. 

अभिनेते वैभव मांगले यांनी गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं साधर्म्य यावर भाष्य केलं आहे. तसेच, त्यांनी एक खंतही बोलून दाखवली आहे. सुरुवातीचा काही काळ सुमनताई लता बाईंसारखच गात होत्या… अनेक अशी उदाहरणं आहेत, ज्यात पटकन सांगता येत नाही की, लताबाई की सुमनताई गातायत, असं वैभव मांगले यांनी म्हटलंय. 

अभिनेता वैभव मांगले नेमकं काय म्हणाले? (Vaibhav Mangale On Suman Kalyanpur)

मराठी अभिनेता वैभव मांगले यांनी दिग्गज गायिका सुमन कल्याणपूर यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये वैभव मांगलेनं लिहिलंय की, "ओठावरी विरला ग आसावला सूर' सुरुवातीचा काही काळ सुमन ताई लता बाईंसारखच गातं होत्या… अनेक अशी उदाहरणं आहेत, ज्यात पटकन सांगता येत नाही की, लताबाई की सुमनताई गातायत... एक द्वंद्व गीत आहे, ते तर कानात प्राण आणून ऐकलं तरीही सांगता येतं नाही… नेमकं कुणी काय गायलंय..."

"सुमनताई लता बाईंसारखं गातात हेच दुर्भाग्य होतं... साक्षात लताबाई असताना... सुमनताईंना कोण बोलवणार? याची सल त्यांना ही असणार, पण ताईंचं मोठे पण असं की, त्यांनी कधी हे कुठेही बोलून नाही दाखवलं… इतका सुज्ञपणा म्हणा किंवा दिलदारपणा म्हणा त्यांच्याजवळ नक्की होता… लताबाईंबरोबर त्याची मैत्री होती... त्यांचा आवाज लता बाईंसारखा जरूर होता... पण स्वर लगाव दोघींचे भिन्न होते... दमसास वेगळा होता...", असं वैभव मांगले म्हणालेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Vaibhav Mangle In Hindi Language Compilation: मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलीय; कशी? वैभव मांगलेंनी उदाहरणासह स्पष्टच सांगितलं

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

OTT Webseries: OTTवर 8 एपिसोडच्या नव्या वेबसिरीजचा धुमाकूळ; रिलीज होताच होतेय ट्रेंड, IMDbवरही 7.1 रेटिंग, कुठे पहाल?
OTTवर 8 एपिसोडच्या नव्या वेबसिरीजचा धुमाकूळ; रिलीज होताच होतेय ट्रेंड, IMDbवरही 7.1 रेटिंग, कुठे पहाल?
Sanjay Narvekar on CJP Protest: 'वास्तव'मधील देढ फुटियाचा जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना पाठिंबा; म्हणाले, 'जंतर मंतरवर अचानक गुंडागर्दी का सुरू झाली? यामागे राजकारण'
'वास्तव'मधील देढ फुटियाचा जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना पाठिंबा; म्हणाले, 'जंतर मंतरवर अचानक गुंडागर्दी का सुरू झाली? यामागे राजकारण'
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलील नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलील नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
Embed widget