Usha Nadkarni : अलका कुबल यांच्याशी बोलणं होतं का? लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्वभाव कसा होता, उषा नाडकर्णी काय म्हणाल्या?
Usha Nadkarni : अलका कुबल यांच्याशी बोलणं होतं का? लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्वभाव कसा होता, उषा नाडकर्णी काय म्हणाल्या?

Usha Nadkarni : "अलका आणि माझं बोलणं नेहमी चालू असतं. व्हाट्सअॅपवर आम्ही नेहमी बोलतो. कधी कधी ती फोन करुन विचारते. आता मास्टरशेफ होता, तेव्हाही तिने मला फोन केला होता. लक्ष्याबरोबर नशिबवान करताना मजा आली होती. तेव्हा सिनेमा करताना मजा यायची. लक्ष्मीकांत बेर्डे माणूस म्हणून मस्त होता. एवढं सगळं मिळालेलं असतानाही त्याच्यामध्ये मोठेपण नव्हता. समोरच्याला कमी लेखणे हे त्याच्यामध्ये कधीच नव्हते. लाईव्ह नाटकात मी विंगेत बसले असेल तर तो नाव घेऊन काहीतरी बोलणारच.. मस्त माणूस होता", असं ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) म्हणाल्या आहेत. त्या एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी सिनेसृष्टीतील अनेक अनुभव सांगितले. माहेरच्या साडी या सिनेमाबाबतच्या आठवणी सांगताना उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांनी विक्रम गोखलेंनी दिलेल्या पार्टीबाबतही सांगितलं.
उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) म्हणाल्या, मी नेहमी सांगते की सुशांत सिंग राजपूतने हँग करुन घेतलेलं नाही. त्याला मारलंय. परवा मी फेसबुक वर बघत होते, एक व्हिडीओ पाहिला. त्यामध्ये सुशांत सिंग राजपूतला मारण्यासाठी जे वापरण्यात आलं ते सगळं आहे. ज'वरुन काहीतरी त्या मुलीचं नाव आहे. मी कायम खरी एकटी असल्यामुळे बोलायला कोण नाही. मी फेसबुक पाहात असते. मला वाटतं माझे डोळे जातील फेसबुकमुळे...त्या व्हिडीओमध्ये सगळं होतं. मी नेहमी सांगते देव आहे.. ज्यांनी सुशांतला मारलं त्यांना देवच शिक्षा देईल.
पुढे बोलताना उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) म्हणाल्या, मला एका प्रोड्युसर बाईंचा फोन आला होता. मला म्हणाल्या, उषा तू खूप छान करतेस. मात्र, मी बघितलं तिकडे हिंदीत तुला खूप प्रेम करतात. मराठी का नाही? मी म्हटलं बाई मराठीत सगळ्यांची जळते. आम्ही हिच्याबद्दल एवढं वाईट बोलतो तरी हिला कामं कशी मिळतात? माझ्याकडे कोणाचे नंबर देखील नाहीयेत. कारण मला नाटक वाल्यांशी देणंघेणं नाहीये. मला तुला फोन करुन मला काम दे, असं म्हणायचं नाहीये. माझ्याकडे दोन एक लोक असतील. बाकी कोणाचेच नंबर नाहीयेत. हिंदीवाल्यांचे देखील नाहीयेत. मला कोणाकडे काम मागत नाहीत. मला काम मिळवण्यासाठी मस्का लावावा लागला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या

















