एक्स्प्लोर

'हे काका कोण?' अभिनेत्रीनं शाहरूख खानचा फोटो केला पोस्ट, अन् म्हटली 'मी यांना ओळखत नाही'; नेटकरी संतापले

Hande Erçels Post on Shah Rukh Khan Sparks Controversy: हांडे एर्सेलला शाहरूख खानची फॅन गर्ल म्हटलं जात होतं. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्पष्टीकरण देत हे आरोप फेटाळले.

Hande Erçel’s Post on Shah Rukh Khan Sparks Controversy: रोमान्सचा बादशाह शाहरूख खानचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्याच्या चाहत्यांचं जाळं सातासमुद्रापार पसरलं आहे. त्यानं अलिकडेच रियाध येथील जॉय अवॉर्ड्सला हजेरी लावली होती.  त्यानं पुरस्कार सोहळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  ज्यामध्ये तुर्की अभिनेत्री हांडे एर्सेल स्टेजवर उभी राहून किंग खानचे चित्रीकरण करत असल्याचं दिसून आली होती. सोशल मीडियावर  तिला शाहरूख खानची फॅन गर्ल म्हटले जात आहे. मात्र, तिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून शाहरूख खानला ओळखत नसल्याचं सांगितलं.   सध्या तिची पोस्ट व्हायरल होत असून, भारतीय नेटकऱ्यांनी तिच्यावर  टीका केली आहे. 

व्हायरल व्हिडिओमध्ये, इजिप्शियन सुंदरी अमिना खलील शाहरूख खानसोबत स्टेजवर दिसत होती.  हांडे एर्सेल हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करत होती.   पण ती शाहरूख खानचे नसून, मैत्रीण अमिना खलीलचे फोटो शूट करत होती. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शाहरूख खान आणि अमीनाचा स्टेजवरील फोटो शेअर केला. तसेच किंग खानचा उल्लेख करत,  हा काका कोण? असे कॅप्शनमध्ये लिहिले.  "मी फक्त माझी मैत्रीण अमीनाचे रेकॉर्डिंग करत होते.  मी त्या व्यक्तीची चाहती नाही. कृपया सोशल मीडियावर  खोट्या अफवा पसरवणे थांबवा", असंही तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं. 

तुर्की अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली.  दरम्यान, आता  हांडे एर्सेलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून  ही  पोस्ट डिलीट केली.  किंग खानचे चाहते या पोस्टमुळे नाराज आहेत. अनेकांनी असा दावा केला की, हांडे एर्सेलची पोस्ट फेक आहे.  मात्र, हांडे एर्सेलची पोस्ट खरी आहे की खोटी? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हांडे एर्सेलला बऱ्याच काळापासून बॉलिवूड सिनेसृष्टतील प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याची होती.  सलमान खानच्या टायगर  3 चित्रपटाचे काही भाग तुर्कीमध्ये चित्रीत झाल्यामुळे तिला  या सिनेमात कास्ट केले जाणार होते, असे वृत्त आहे. मात्र, ती या चित्रपटात दिसली नाही. भारत दौऱ्यादरम्यान,  हांडे एर्सेलने बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.  जर, तिला बॉलिवूडमध्ये काम करण्याची इतकी आवड होती, तर ती शाहरूख खानला कशी ओळखत नाही?  असा सवाल आता नेटकरी उपस्थित करत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'काम मिळत नसेल तर पुन्हा हिंदू धर्म स्वीकारा'; गायक अनुप जलोटांचा ए.आर रहमान यांना खोचक सल्ला

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री
अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री
Sushant Singh Saurav Ganguly: राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
Toxic Film yash and kiara: रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., 'टॉक्सिक'चं 'तबाही' गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम
रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., 'टॉक्सिक'चं 'तबाही' गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम
Drishyam fame Actor Financial Loss: 'दृश्यम'मधला खतरनाक गायतोंडे आठवतोय?अभिनेत्याला 'या' चुकीमुळे बसलाय 70 लाखांचा फटका! म्हणाले ..
'दृश्यम'मधला खतरनाक गायतोंडे आठवतोय?अभिनेत्याला 'या' चुकीमुळे बसलाय 70 लाखांचा फटका! म्हणाले ..

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
US Iran War : अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतात शेअर मार्केट क्रॅश, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर भडकले, पुन्हा युद्धाचं संकट 
अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जगावर युद्धाचं पुन्हा संकट?
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
Share Market Crash :  डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
Embed widget