Tunisha Sharma : तुनिषा शर्माच्या कुटुंबाकडून अभिनेता शिजान खानवर आरोप; पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं
Tunisha Sharma Suicide case : अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अॅक्टर शिजान खान याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे.
Tunisha Sharma Suicide case : अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आज एका मालिकेचे शूटिंग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन तुनिषाने जीवन संपवलं. नायगाव येथील स्टुडिओतील सेटवर ही घटना घडली. वसईच्या कामन परिसरातील भजनलाल स्टुडिओमध्ये ही घटना घडली आहे. वळिव पोलिस या घटनेचा सखोल तपास करत असून अली बाबा मालिकेचा लीड अॅक्टर शिजान खान याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. तुर्तास कलम 306 अंतर्गत आत्महत्या केल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टुनिशा शर्माच्या कुटुंबाचे शिजान खानवर आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्माच्या कुटुंबानं अली बाबाचा मुख्य अभिनेता शिजान खानवर आरोप केले आहेत. तुनिषा आणि शिजानचं अफेयर होतं. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. वळीव पोलीस ठाण्यात टुनिषाची आई विनिता शर्मा हिने अलिबाबा या मलिकेतील अभिनेता शिजान खान याच्या विरोधात तक्रार दिली आहे. आईच्या म्हणण्यानुसार शिजान आणि तुनिषा यांंचं प्रेमसंबंध होते. सध्या शिजानला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिस आता शिजानची चौकशी करणार आहेत. तुनिषा शर्मा हिचा मृतदेह सध्या प्राथमिक तपासासाठी नालासोपारा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले आहेत. तुनिषा शर्मा हिचा मृतदेहाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात घेऊन जाणार आहेत.
वसई पोलिसांनी सांगितलं की, आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास तुनिषा मेकअप रुममधील बाथरुममध्ये लटकलेल्या स्थितीत आढळून आली. त्यानंतर सहकारी कलाकारांनी तिला जवळच्या दवाखान्यात नेले. मात्र तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिस मात्र या घटनेचा आत्महत्या आणि हत्या या दोन्ही अंगानी तपास करत आहेत.
दरम्यान शिजान आणि तुनिषा आपल्या इन्स्टाग्रामवर एकमेकांचे फोटो देखील शेअर करत होते. आज घटनेच्या काही तास अगोदर तुनिषानं मेकअप करत असतानाचा एक व्हिडीओ स्टोरीला ठेवला आहे. सोबतच एक फोटो देखील पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
ही बातमी देखील वाचा