एक्स्प्लोर

Tumbadchi Manjula Poster Out: पळा… ‘ती’ येतेय! ‘तुंबाडची मंजुळा’ पोस्टरनं धडधड वाढली, नव्या twist ने उत्सुकता शिगेला

Tumbadchi Manjula Poster Out: झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, हा चित्रपट ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tumbadchi Manjula:झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचं नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रकाशित झालं असून तो सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. लाल साडी आणि पैंजणाने सजलेलं एका स्त्रीचं भारदस्त पाऊल जे गावाच्या आणि गावकऱ्यांच्या दिशेने पडतंय आणि ते बघून भेदरलेले गावकरी पळ काढतायत अशी भन्नाट संकल्पना या पोस्टरमधून मांडण्यात आली आहे. या सगळ्या गोंधळात एक भन्नाट कॉमिक टचही जाणवतो. यावरून हा चित्रपट केवळ घाबरवणार नाही, तर प्रेक्षकांना खळखळून हसवणार असल्याचेही स्पष्ट होतंय. (Tumbadchi Manjula Poster Out)

पोस्टरमधील कोकणातील गावाचं वातावरण, उडणारी धूळ, घाबरलेले लोक आणि त्यांच्यावर घोंगावणारी ती सावली सगळंच काहीतरी अनपेक्षित घडणार असल्याची चाहूल देतं. त्यामुळे ही ‘मंजुळा’ नक्की आहे तरी कोण? भूत? की काहीतरी वेगळंच? या सगळ्या गोंधळामागे नेमकं काय रहस्य दडलंय ते उलगडण्यासाठी प्रेक्षकांना ५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

कोकणातील गाव, अतरंगी माणसं आणि ‘मंजुळा’

या पोस्टरच्या अनोख्या संकल्पनेबद्दल बोलतांना  स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, “कोणत्याही चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण करणाऱ्या मुख्य घटकांमध्ये पोस्टरची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. यामुळेच या पोस्टरमधून चित्रपटाच्या गोष्टीचा, विषयाचा अंदाज यावा शिवाय ते गूढही कायम राहावं असा विचार होता. या सोबतीनेच यातील एकाहून एक मातब्बर कलाकारांचीही नव्याने ओळख व्हावी या उद्देशाने हे पोस्टर बनवले आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढेल याची खात्री आहे. कोकणातील गाव, तिथली अतरंगी माणसं आणि ‘मंजुळा’ या गूढ पात्राभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांना वेगळाच अनुभव देईल. हा पूर्णपणे कॉमेडी हॉरर एंटरटेनर असून सहकुटुंब पाहाण्यासारखा आहे.” 

कधी होणार प्रदर्शित?

ऋषिकेश तुरई यांच्या लेखनातून साकारलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन विविध कोरगांवकर यांनी केलं असून, यात जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व रुके, प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी यांची दमदार फौज पाहायला मिळणार आहे. झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, हा चित्रपट ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Embed widget