Munmun Dutta : आलिया भट्टच्या ‘Dholida’वर बबिताजींनी धरला ठेका, व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना आली ‘दयाबेन’ची आठवण!
व्हिडीओत मुनमुन दत्ता ‘ढोलिडा’ (Dholida) गाण्यावर गरबा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना दयाबेनचा गरबा आठवला आहे.
Munmun Dutta : मुनमुन दत्ता (Munmun Dutta) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असते. आता मुनमुन दत्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ‘बबिताजीं’ची भूमिका साकारणाऱ्या मुनमुनची ही शैली पाहून चाहतेही खूप खूश झाले आहेत.
या व्हिडीओत मुनमुन दत्ता ‘ढोलिडा’ (Dholida) गाण्यावर गरबा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना दयाबेनचा गरबा आठवला आहे. मुनमुनने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्याला तिच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली असून, भरभरून लाईक्स आणि कमेंट्सही केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका चाहत्याने ‘मुनमुन दत्ता – सुंदर’, अशी कमेंट केली आहे.
पाहा व्हिडीओ :
मुनमुन दत्ता बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे, पण तिला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमधून खरी ओळख मिळाली. या शोमध्ये ती गेल्या 13 वर्षांपासून ‘बबिता जीं’च्या भूमिकेत दिसत आहे. मालिकेतील ही स्टायलिश आणि ग्लॅमरस भूमिका साकारून मुनमुनने खूप मोठी फॅन फॉलोइंगही तयार केली आहे.
वादांमुळे चर्चेत अभिनेत्री!
मुनमुन दत्ता अनेकदा वादात अडकलेली दिसते. तिच्या गतवर्षीच्या जातीवाचक वक्तव्यावरून बराच गदारोळ झाला होता आणि हे प्रकरण अद्यापही बंद झालेले नाही. याशिवाय मुनमुन दत्ता अनेक वादग्रस्त खुलासे करूनही चर्चेत आली आहे. अलीकडेच ती ‘बिग बॉस 15’मध्ये पाहुणी स्पर्धक म्हणूनही दिसली होती.
हेही वाचा :
- Disha Patani : 80 किलो वजन उचलून दिशाचं वर्कआऊट; टायगरची बहिण आणि आई म्हणाली...
- Madhuri Dixit : 'हे' गाणं पाहण्यासाठी माधुरी बुरखा घालून गेली चित्रपटगृहात ; सांगितला किस्सा
- Rashmika Mandanna-Vijay Deverakonda : विजय देवरकोंडासोबत जोडलं जातंय रश्मिकाचं नाव ; लग्नाबाबत नॅशनल क्रश म्हणाली...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha