Tirsaat Marathi Movie : ‘तिरसाट’मधून दिसणार प्रेम मिळवण्याची धडपड! चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Tirsaat Marathi Movie : प्रेम मिळवण्यासाठी सहन करावा लागणारा विरोध, प्रेमासाठी करावी लागणारी धडपड या टीझरमधून दाखवण्यात आली आहे. त्यामुळे तिरसाट हा चित्रपट उत्सुकता वाढवत आहे.

Tirsaat Marathi Movie : आयुष्यातली सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम... हे प्रेम मिळवण्यासाठी किती धडपड करावी लागते, त्यासाठी किती काय काय झेलावं लागतं याची थरारक गोष्ट ‘तिरसाट’ (Tirsaat) या चित्रपटातून उलगडणार आहे. 20 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्सनं ‘तिरसाट’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अँड. उमेश शेडगे सहनिर्माते आहेत.
निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. पी. शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे.
पाहा टीझर :
प्रेम मिळवण्यासाठी सहन करावा लागणारा विरोध, प्रेमासाठी करावी लागणारी धडपड या टीझरमधून दाखवण्यात आली आहे. त्यामुळे तिरसाट हा चित्रपट उत्सुकता वाढवत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातलं ‘उधाण आलंया, फरमान आलंया, जीवाला या जीवाचं आवताण आलंया,' असे शब्द असलेलं गाणं लाँच करण्यात आलं. या गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. आता या टीजरमुळे आता चित्रपटाची आणखी चर्चा सुरू झाली आहे.
नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरून ही एक प्रेमकहाणी असल्याचं कळतं. नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. रिफ्रेशिंग अशा या पोस्टरमुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाची कथा नेमकी काय असणार, यात आणखी कोणकोणते कलाकार दिसणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र, या नव्या पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता मात्र वाढवली आहे. आयुष्याला सकारात्मक करणारा आणि प्रेमात न पडणाऱ्या लोकांना देखील प्रेमात पडायला लावणारा असा हा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा :
Khatija Rahman : खतीजा रहमानचा निकाह संपन्न! ए.आर.रहमानने लेकीला शुभेच्छा देत शेअर केली खास पोस्ट..
KGF 2 Breaks Record: ‘केजीएफ 2’ची बॉक्स ऑफिसवर हवा! ‘RRR’ला मागे टाकत ‘रॉकी भाई’चा नवा रेकॉर्ड!






















