Tiger Shroff Forensic Report: टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! देशी पिस्तुलाचा वापर अन् शूटरचे दोन प्रयत्न, दुचाकीवरुन आरोपी कसे पळाले? फॉरेन्सिक रिपोर्ट समोर
Tiger Shroff Forensic Report: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात फॉरेन्सिक रिपोर्ट समोर. रिपोर्टमधून काय काय समोर आलं?

Tiger Shroff Shooting Case: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) चारचाकी हल्ला प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांसह (Mumbai Police) फॉरेन्सिक टिमकडून (Forensic team) कसून तपास केला जात आहे. फॉरेन्सिक तपासात एक महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. टायगर श्रॉफच्या BMW चारचाकीवर गोळीबारासाठी देशी पिस्तुलाचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 'कॉपी पीस' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देशी पिस्तुलाचा (Deshi Pistol) वापर केला आहे. याच देशी पिस्तुलातून एकूण 7 राऊंड फायरिंग केली असल्याची माहिती आहे.
घटनेवेळी नेमकं काय काय घडलं, फॉरेन्सिक रिपोर्टमधून सर्वच स्पष्ट (Tiger Shroff Shooting Case Forensic Report)
टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात आता फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे. आरोपींनी 'कॉपी पीस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशी पिस्तुलाचा वापर केला आहे. एकूण 7 राऊंड फायरिंग केली असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
कारच्या समोरील विंडशील्ड आणि बाजूच्या खिडकीला लक्ष्य करत गोळीबार करण्यात आला, अशी देखील माहिती समोर आली आहे. एकूण 7 राऊंड फायरिंग करण्यात आली असून, 7 पैकी 5 गोळ्या कारला लागल्या. तर, 2 गोळ्या लक्ष्य चुकवून गेल्या. पाचवी गोळी झाडल्यानंतर पॅसेंजर साइडच्या खिडकीजवळ असलेल्या शूटरने, टायगर श्रॉफवर अगदी जवळून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तूल जाम झाल्याने गोळी झाडता आली नाही. शूटरने दोनदा प्रयत्न केल्याची सूत्रांची माहिती.
पिस्तुलात बिघाड झाल्याने टायगर श्रॉफवर जवळून गोळी झाडली जाण्याचा धोका टळल्याचा अंदाज आहे. या भयंकर घटनेनंतर दोन्ही शूटर पसार झाले. तिसऱ्या साथीदाराने तयार ठेवलेल्या मोटारसायकलवरुन फरार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या चौकीजवळ सीसीटीव्हीच्या नजरेतून सुटण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी मोटारसायकल सोडल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपी सूरतच्या दिशेने पसार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















