एक्स्प्लोर

Tiger Shroff Attack Incident Salman Khan: टायगर श्रॉफवर हल्ला होताच भाईजानची सुरक्षा वाढवली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर, कारण काय..

Tiger Shroff Shooting Incident: टायगर श्रॉफच्या गाडीवरील हल्ल्यानंतर सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ.

Tiger Shroff Salman Khan: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) चारचाकीवर काल रात्री 18 ऑक्टोबर रोजी जीवघेणा हल्ला झाला. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या चारचाकीवर गोळीबार केला.  सुदैवाने टायगर श्रॉफला (Tiger Shroff Firing) कोणतीही दुखापत झालेली नाही. पण ड्रायव्हर जखमी झाला आहे. तसेच आणखी एक ऑटो ड्रायव्हर जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर सिनेइंडस्ट्रीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टायगर श्रॉफवरील जीवघेण्या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) घेतली आहे. त्याने टायगरसह इतर बॉलिवूड कलाकारांना अभिनेता सलमान खानपासून (Salman Khan) दूर राहण्याची धमकी दिली आहे.  दरम्यान, या सर्व प्रकरणात मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आली असून, पोलिसांनी वांद्रे (Bandra Galaxy Apartment) येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सुरक्षाही वाढवली आहे. 

सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांकडून सुरक्षेत वाढ (Salman Khans Mumbai Bandra Galaxy Apartment Security Increased)

मुंबई पोलिसांकडून सध्या हल्लेखोरांचा तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी गोळीबार प्रकरणात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. बाईकच्या नंबर प्लेटवरुन सध्या हल्लेखोरांचा तपास केला जात आहे. मुख्य म्हणजे या हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून बिश्नोई टोळीनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.  दरम्यान,  आता मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आली असून, बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सुरक्षा वाढवली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गॅलेक्सी अपार्टमेंट परिसरात  सध्या बुलटप्रूफ जॅकेट घातलेले पोलीस तैनात करण्यात आले आहेत.  गॅलेक्सी अपार्टमेंट परिसरात पोलीस वाहने देखील उपस्थित आहेत.  दरम्यान, सलमान खानने जाहीर केले की, तो 'बिग बॉल 20'च्या पुढच्या भागात 'विकेंड का वार' एपिसोडमध्ये दिसणार नाही.  काल 'विकेंड का वार'मध्ये सलमान खानने स्वत:सदस्यांना याची माहिती दिली.  सलमान खानने सांगितले की, कामातील काही वर्क कमिटमेंटमुळे  तो या  आठवड्याच्या शोचे सूत्रसंचालन करणार नाही. त्याच्या जागी रोहित शेट्टी दिसणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Tiger Shroff Disha Patani: डोळ्यांत अश्रू, चेहऱ्यावर चिंता! टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर दिशा पटानी धावत पोहोचली अभिनेत्याच्या घरी; VIDEO व्हायरल

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan : इमरान खानला मोठा दिलासा, देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती, मुंबई हायकोर्टाचा निर्णय, पुढील सुनावणी कधी?
इमरान खानला मोठा दिलासा,मुंबई हायकोर्टाचा निर्णय, मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसला स्थगिती 
CID Director Death: 'CID' अन् 'आहट'चे दिग्दर्शक बी.पी सिंह यांचं निधन; हृदयविकाराच्या झटक्याने घेतला अखेरचा श्वास, चाहते हळहळले
'CID' अन् 'आहट'चे दिग्दर्शक बी.पी सिंह यांचं निधन; हृदयविकाराच्या झटक्याने घेतला अखेरचा श्वास, चाहते हळहळले
Sayaji Shinde Son Debut Movie: सयाजी शिंदेंच्या लेकाला पाहिलंत का? लवकरच बाप - लेकाची जोडी रुपरी पडद्यावर झळकणार, कधी होणार रिलीज?
सयाजी शिंदेंच्या लेकाला पाहिलंत का? लवकरच बाप - लेकाची जोडी रुपरी पडद्यावर झळकणार, कधी होणार रिलीज?
Shraddha Kapoors Eetha: प्रतिक्षा संपली! श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाबाबत मोठी अपडेट, कधी होणार ट्रेलर रिलीज? तारीख समोर
प्रतिक्षा संपली! श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाबाबत मोठी अपडेट, कधी होणार ट्रेलर रिलीज? तारीख समोर
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
Assembly Elections : अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
Imran Khan : इमरान खानला मोठा दिलासा, देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती, मुंबई हायकोर्टाचा निर्णय, पुढील सुनावणी कधी?
इमरान खानला मोठा दिलासा,मुंबई हायकोर्टाचा निर्णय, मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसला स्थगिती 
Embed widget