एक्स्प्लोर

टीव्हीवर असा थेट रक्तपात असावा का? 'देवमाणूस'च्या प्रोमोमुळे सोशल मीडियावर चर्चा

झी मराठीवर रात्रीस खेळ चाले मालिका बंद होऊन तिच्या जागी नवी मालिका येते आहे देवमाणूस. या नव्या मालिकेचे प्रोमो आता टीव्हीवर आले आहेत. या प्रोमोची सुरूवातीपासूनच चर्चा झाली आहे.

मुंबई : छोट्या पडद्यावर सतत काही ना काही गोष्टी घडत असतात. काही मालिका बंद होतात तर त्यांची जागा नव्या मालिका घेत असतात. आताही झी मराठीवर एक मालिका बंद होऊन नवी मालिका सुरू होते आहे. बंद होणाऱ्या मालिकेचं नाव आहे रात्रीस खेळ चाले आणि त्याजागी नवी मालिका येते आहे देवमाणूस. या नव्या मालिकेचे प्रोमो आता टीव्हीवर आले आहेत. या प्रोमोची सुरूवातीपासूनच चर्चा झाली आहे. असे प्रोमो टीव्हीवर दाखवावेत का? असा विषय सध्या जोर पकडू लागला आहे. देवमाणूस ही एक थ्रिलर मालिका आहे. देवमाणसाच्या चेहऱ्या आड लपलेला राक्षसी चेहरा यात दाखवण्याचा प्रयत्न आहे. ही एक मर्डर मिस्ट्री आहे. या मालिकेचा प्रोमोही तसाच थरारक झाला आहे. एक महिला डॉक्टरला मूल होत नसल्याबद्दल सांगते. डॉक्टर म्हणतो मी आहे ना. काही काळानंतर आपल्या घरच्यांना संशय आल्याचं ती महिला डॉक्टरांना सांगते. डॉक्टर चल बघू.. तुला चेक करू असं म्हणत तिला खोलीत नेतात आणि तिला तपासण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्यावर सपासप वार करतात. असा हा प्रोमो आहे. याच प्रोमोवरून सध्या सोशल मीडियावर वाद सुरू आहे. टीव्ही मालिका हे घरातले अबालवृद्ध बघत असतात. अशी थेट दृश्य दाखवल्याने लहान मुलांवर परिणाम होतो असं एक मत प्रेक्षक राजन पाटील यांनी मांडलं आहे. हा प्रोमो आल्यानंतर आपली नात आपल्याला अनेक प्रश्न विचारू लागली असंही त्यांनी यात म्हटलं आहे. त्यामुळे प्रोमो करायला हरकत नाही. मालिका गूढ, थरारक असेल तर तेही चालेल. पण थेट असा रक्तपात नको असं त्यांचं म्हणणं. गौरव देशमुख यांनीही अशा प्रोमोकडे लक्ष वेधलं आहे. असा रक्तपात दाखवायची गरज नाही. या मालिकेची वेळ रात्री साडेदहाची आहे. जिथे सगळं कुटुंब टीव्हीसमोर येऊन बसलेलं असतं. अशावेळी सूचक गोष्टी दाखवण्यावर भर हवा असं ते म्हणतात. तर रेश्मा भिसे यांना मात्र ते योग्य वाटतं. त्या म्हणतात, आता अनेक सिनेमात, मालिकात अशी दृश्य असतात. वेबसिरीजमध्ये तर त्याहीपेक्षा वाईट दृश्य असतात..  प्रोमो हा चित्ताकर्षक असतो. याचा अर्थ मालिकेत सतत असं काहीतरी असेलच असं नाही. या मालिकेच्या प्रोमोची चर्चा जोरदार आहे. टीव्हीवर असा कंटेंट घालवावा की नाही यावर सध्या चर्चा आहे. लोकांना हा प्रोमो आवडला नसेल तर ते तक्रारही करूच शकतात. देवमाणूस ही मालिका सुरूवातीपासूनच चर्चेत आली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget