Thalapathy Vijays Jana Nayagan: विजय थलपतीच्या 'जन नायगन'चा 11व्या दिवशीही बोलबाला; रविवारी कोटींच्या घरात कमाई, प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जन नायगन'ने बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवला?

Jana Nayagan box Office collection: साऊथ सुपरस्टार आणि तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री विजय थलपती (Thalapthy Vijay) यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांचा बहुप्रतिक्षित 'जन नायगन' हा सिनेमा 23 जुलै रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला होता. 'जन नायगन' (Jana nayagan) हा एक पॉलिटिकल ड्रामा सिनेमा आहे. ओपनिंग डे पासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. विशेषत: त्याच्या चाहत्यांना (box office collection) हा सिनेमा प्रचंड आवडला. पुन्हा एकदा विजय थलपती यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. यावेळी क्रिटिक्सकडूनही या सिनेमाची प्रशंसा करण्यात आली. उत्तम रिव्ह्यू या सिनेमाला मिळाला आहे.
'जन नायगन'ने रविवारी किती कोटींचा टप्पा ओलांडला? (Jana Nayagan Sunday box office collection)
आता या सिनेमाच्या टक्करला 'स्पायडर मॅन: ब्रांड न्यू डे' हा सिनेमा रिलीज झाला आहे. हा हॉलिवूड सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे. दरम्यान, 'जन नायगन'च्या कलेक्शनबाबत बोलायचं झाल्यास, 'जन नायगन'ने रविवारी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. रविवारी या सिनेमाने किती कोटींचं कलेक्शन केलं? जाणून घेऊयात.
'जन नायगन' हा सिनेमा पाहण्यासाठी थलपती विजय यांचे फॅन्स प्रचंड उत्सुक होते. अशातच 'जन नायगन' या सिनेमाची रविवारची बॉक्स ऑफिस कलेक्शनची आकडेवारी समोर आली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार, 'जन नायगन' या सिनेमा 11 व्या दिवशी म्हणजेच रविवारी 10.70 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. भारतात हा विविध भाषांमध्ये रिलीज झाला. या सिनेमाच्या संपूर्ण 11 दिवसांच्या कलेक्शनबाबत बोलायचं झाल्यास.
'जन नायगन'ने 11 दिवसांत भारतात एकूण किती कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले?
View this post on Instagram
'जन नायगन'ने भारतात एकूण 11 दिवसांत 175.60 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे. लवकरच हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा पार करेल, यात शंका नाही. 'जन नायगन' हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगु अशा तीन भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. हिंदीमध्ये या सिनेमाने 15.25 कोटींचं कलेक्शन केलं. तामिळ भाषेत या सिनेमाने 151.45 कोटींचं कलेक्शन केलं. तर, तेलुगु भाषेत 8.90 कोटींचं कलेक्शन केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























