Actress Sowmya Janu : अभिनेत्रीचा भररस्त्यात राडा, ट्राफिक होमगार्डचे कपडे फाडले; पोलिसांत गुन्हा दाखल
Actress Sowmya Janu : ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक होमगार्डला तिने मारहाण केल्याचा आरोप आहे. संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हैदराबादच्या बंजारा हिल्स भागातील ही घटना आहे.
Actress Sowmya Janu : दाक्षिणात्य अभिनेत्रीने भररस्त्यात राडा केला. या अभिनेत्रीने ट्राफिक होमगार्डचे कपडे फाडत त्याला मारहाण केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्रीने भररस्त्यात घातलेल्या या गोंधळामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
तेलगू अभिनेत्री सौम्या जानूचा (Actress Sowmya Janu) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक होमगार्डला तिने मारहाण केल्याचा आरोप आहे. संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हैदराबादच्या बंजारा हिल्स भागातील ही घटना आहे.
वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना रविवारी 25 फेब्रुवारी रोजी घडली. बंजारा हिल्समध्ये चुकीच्या मार्गाने आपली जग्वार कार चालवत असलेल्या अभिनेत्री सौम्याला ट्रॅफिक होमगार्डने अडवले. व्हिडिओवरील टाइमस्टॅम्पनुसार, शनिवारी, 24 फेब्रुवारी रोजी रात्री 8:24 च्या सुमारास हा गोंधळ झाला. ट्राफिक होमगार्डला सहकार्य करण्याऐवजी, सौम्या जानू संतप्त झाली आणि तिला अडवल्याबद्दल गार्डला शिवीगाळ केली असल्याचा आरोप आहे.
వచ్చిందే రాంగ్ రూట్.. అడిగితే హోమ్ గార్డ్ బట్టలు చింపిన లేడీ
— Telugu Scribe (@TeluguScribe) February 25, 2024
బంజారాహిల్స్ - ట్రాఫిక్ హోమ్ గార్డ్ పై మహిళ వీరంగం. జాగ్వర్ కార్లో రాంగ్ రూట్లో రావడమే కాకుండా అడ్డుకున్న హోంగార్డుపై బూతులు తిడుతూ అతని బట్టలు చింపి దాడి చేసిన మహిళ. కేసు నమోదు చేసిన పోలీసులు. pic.twitter.com/xYvWnndmo1
सौम्याने गार्डचे कपडे फाडले...
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, इतरांनी मध्यस्थी करूनही अभिनेत्री संतापलेलीच होती. रस्त्यावर आरडाओरड सुरू होता. ट्राफिक होमगार्डने तिने हल्ला केला. त्याचा युनिफॉर्मही फाडला. या घटनेचा व्हिडीओ तयार करणाऱ्या लोकांवर तिने हल्ल्याचा प्रयत्न केला.
View this post on Instagram
पोलिसांत तक्रार
या घटनेनंतर ट्राफिक होमगार्डने बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात तक्रार केली. पुरावा म्हणून त्याने पोलिसांमध्ये व्हिडीओदेखील सोपवले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.