Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Sangharsh Yoddha Box Office Collection : पाचव्या आणि सहाव्या दिवशी अवघ्या चार लाखांची कमाई, बॉक्स ऑफिसवर 'संघर्षयोद्धा'ची घोडदौड मंदावली


मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर आधारित 'संघर्षयोद्धा' (sangharsh yoddha) हा सिनेमा 14 जून रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. पण पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये सुरु केलेला मराठा आरक्षणाचा लढा या सिनेमात दाखवण्यात आला आहे. पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत नसल्याचं चित्र सध्या आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Amhi Jarange : 'आम्ही जरांगे' सिनेमाचा सेन्सॉर बोर्डासोबत संघर्ष, दिग्दर्शक पोस्ट करत म्हणाले, 'जसे जरांगेंच्या पाठिशी उभे राहिलात तसेच सिनेमाच्याही रहाल ही खात्री...'


बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'आम्ही जरांगे' (Amhi Jarange) हा सिनेमा येत्या 21 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण पुन्हा एकदा सेन्सॉर बोर्डाकडून या सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे. यासंदर्भात सिनेमाच्या दिग्दर्शक योगेश भोसले यांनी पोस्ट लिहित प्रेक्षकांना आवाहन देखील केलं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Deepika Padukone : पाच महिन्याची गरोदर आहेस, हे शोभतं का तुला? दीपिकाच्या 'या' कृतीवर नेटकऱ्यांचा संताप


Deepika Padukone :  बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) कायमच आपल्या चित्रपटातील भूमिकांमुळे, प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत असते. सध्या दीपिका पदुकोण ही पाच महिन्यांची गरोदर आहे. मॉम टू बी दीपिकाने बुधवारी संध्याकाळी आगामी 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटला हजेरी लावली. या वेळी ब्लॅक बॉडिकॉन ड्रेसमध्ये असलेल्या दीपिकाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. बेबी बम्प दाखवणाऱ्या दीपिकावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. तर, काहींनी या कार्यक्रमात हजेरी लावलेल्या दीपिकावर दोन खडे बोल सुनावण्याचा प्रयत्न केला. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Aditya Sarpotdar : 'मुंज्या'नंतर आदित्यचा सरपोतदारचा नवा हॉरर-कॉमेडीपट, कधी आणि कुठे रिलीज होणार 'ककुडा'?


 'मुंज्या' चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर एकच धमाल उडवून दिली आहे. प्रेक्षकांकडून 'मुंज्या' (Munjya) सारख्या हॉरर कॉमेडीपटाला प्रतिसाद मिळत असताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा (Aditya Sarpotdar) दुसरा हॉरर कॉमेडीपट 'ककुडा' (Kakuda) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश देशमुख ( Riteish Deshmukh) आणि सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. रितेशसोबत आदित्यचा हा दुसरा चित्रपट आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षीच्या लग्नावरुन शत्रुघ्न सिन्हाच्या 'रामायण' मध्ये सुरू आहे 'महाभारत'?


 बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि अभिनेता झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या दोघांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. या दोघांचा साखरपुडा 22 जून रोजी होणार असून 23 जून रोजी नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंट बेस्टियनमध्ये रिसेप्शन पार्टी होणार आहे. यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही जवळच्या व्यक्तींचा समावेश असणार आहे. मात्र, सोनाक्षीने घेतलेल्या लग्नाच्या निर्णयावरून तिचे कुटुंबीय फारसे खूश नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांचे घर 'रामायण' मध्ये 'महाभारत' सुरू आहे का , याची चर्चा सुरू झाली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा