Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Wedding :  बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि अभिनेता झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या दोघांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. या दोघांचा साखरपुडा 22 जून रोजी होणार असून 23 जून रोजी नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंट बेस्टियनमध्ये रिसेप्शन पार्टी होणार आहे. यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही जवळच्या व्यक्तींचा समावेश असणार आहे. मात्र, सोनाक्षीने घेतलेल्या लग्नाच्या निर्णयावरून तिचे कुटुंबीय फारसे खूश नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांचे घर 'रामायण' मध्ये 'महाभारत' सुरू आहे का , याची चर्चा सुरू झाली आहे.


सोनाक्षीचे वडील आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha), आई पूनम सिन्हा हे सोनाक्षीच्या निर्णयावर खूश नसल्याचे म्हटले जात आहे. आंतरधर्मीय विवाह असल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे. 


झहीर इक्बाल आणि सोनाक्षीच्या विवाहाबाबत तिच्या कुटुंबीयांना प्रश्न विचारल्यानंतर कोणीही  समाधानकारक उत्तरे दिली नाही. सोनाक्षीचा भाऊ लव याने कमेंटही करण्यास नकार दिला होता. तर, शत्रुघ्न सिन्हा यांनी माझ्या मुलीचे लग्न होतेय हे मला माहित नाही. हल्ली मुलं आपल्या आईवडीलांना कुठं विचारतात, असेही त्यांनी म्हटले होते. 


आधी सांगितलं, मला काहीच माहित नाही...


सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न यांनी 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, “आतापर्यंत माझ्या मुलीच्या लग्नाबाबत मी मीडियामध्ये जेवढं वाचलं आहे, तेवढीच माहिती मला आहे. मी अद्याप सोनाक्षीशी याबद्दल बोललो नाही. तसेच तिने ही  मला आतापर्यंत याबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले. 


त्यांनी पुढे सांगितले की, “जेव्हाही सोनाक्षी माझ्याशी याबद्दल बोलेल तेव्हा माझे आशीर्वाद तिच्यासोबत असतील. तिला जगातील सर्व सुख मिळावे अशी आमची इच्छा आहे. सध्या मी एवढेच सांगेन की आजकालची मुले त्यांच्या पालकांची संमती घेत नाहीत, ते फक्त त्यांना माहिती देतात. आम्हाला या लग्नाची माहिती कधी दिली जाईल याचीही आम्ही वाट पाहत आहोत असेही शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले. 


नंतर बोलले मला एकच मुलगी आहे...






शत्रुघ्न सिन्हा यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, मी लग्नाच्या कन्फर्मेशनवर कोणतेही भाष्य करणार नाही. पुढे काय होणार हे वेळच सांगेल.सोनाक्षीला आम्हा सगळ्यांचा आशिर्वाद आहे. ती माझी एकुलती एक मुलगी असून माझ्या जवळ आहे. सोनाक्षीचा वडील असल्याचा मला गर्व वाटतो. इतक्या वर्षात तिने एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. ती एक चांगली अभिनेत्री आहे, हे तिने सिद्ध केले असल्याचे कौतुकोद्गारही शत्रुघ्न सिन्हा यांनी काढले.


भाऊ लवचा ही भाष्य करण्यास नकार...


'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, सोनाक्षीचा भाऊ लव याने म्हटले की,  “मी सध्या मुंबईबाहेर आहे. या प्रकरणी मी कोणतेही भाष्य करणार नाही.



सोनाक्षीचा भाऊ लव आणि आई पूनम सिन्हा यांनी सोनाक्षीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याची बातमीही खूप चर्चेत होती. मात्र, लव आणि पूनमने यापूर्वी सोनाक्षीला इन्स्टाग्रामवर फॉलो केले होते की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. पण आता लव आणि पूनम सोनाक्षीला फॉलो करत नसल्याचे दिसून येत आहे.