Munjya Director Aditya Sarpotdar : 'मुंज्या' चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर एकच धमाल उडवून दिली आहे. प्रेक्षकांकडून 'मुंज्या' (Munjya) सारख्या हॉरर कॉमेडीपटाला प्रतिसाद मिळत असताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा (Aditya Sarpotdar) दुसरा हॉरर कॉमेडीपट 'ककुडा' (Kakuda) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश देशमुख ( Riteish Deshmukh) आणि सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. रितेशसोबत आदित्यचा हा दुसरा चित्रपट आहे. 


'ककुडा' या चित्रपटाचा फर्स्ट लूक आउट करण्यात आला आहे. अॅनिमेशन असलेल्या या फर्स्ट लूकमध्ये  घड्याळात 7.15 वाजलेले दाखवण्यात आले आहे. सव्वा सात वाजण्याच्या सुमारास एक सावली दिसते. त्यानंतर घराचा दरवाजा ठोठावण्यात येतो आणि कोणाचे तरी पाय लटकलेले दिसतात. या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोबतच्या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले की, ककुडा येण्याची वेळ झाली आहे. मंगळवार, सायंकाळी 7.15 वाजता... दरवाजा उघडण्यास विसरू नका... कारण सर्व पुरुष धोक्यात आहेत....







कधी आणि कुठे होणार रिलीज?


'ककुडा'हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नाही. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज होणार आहे. मात्र, त्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. 


'ककुडा'ची स्टोरी काय?


'ककुडा'ची गोष्ट एका गावातील आहे.  इथे घराला दोन दरवाजे आहेत. एक मोठा आणि दुसरा लहान. येथे दर मंगळवारी संध्याकाळी 7.15 वाजता छोटा दरवाजा उघडा ठेवला जातो आणि जो घरप्रमुख असे करत नाही त्याला शिक्षा दिली जाते. ककुडा कोण आहे आणि हा विधी न केल्याबद्दल शिक्षा का आहे आणि हे गाव या शापापासून मुक्त होईल का? हे प्रश्न तुम्हाला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजणार आहे. या चित्रपटाची कथा 'मुंज्या' प्रमाणे लोककथेवर आधारीत आहे. 


आदित्य-रितेशची हिट जोडी पुन्हा एकत्र


आदित्य आणि रितेशचा हा दुसरा चित्रपट आहे.  याआधी दोघांनी माऊली या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. रितेशची मु्ख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्यने केले होते. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आदित्य सरपोतदारने मराठीत दिग्दर्शित केलेले चित्रपट चांगलेच यशस्वी ठरले. 'नारबाची वाडी', 'उलाढाल', 'झोंबिवली', 'सतरंगी रे', 'माऊली' आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.