Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


 


OTT Weekend Release : मसालापट ते क्राईम थ्रिलरपट; या वीकेंडला ओटीटीवर काय पाहाल?



OTT Release This Week : ओटीटी प्लॅटफॉर्मवर या वीकेंडला (OTT Weekend Release) काही चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार आहे. यामध्ये मसालापट,अॅक्शनपट, क्राईम थ्रीलरचा समावेश असलेल्या वेब सीरिज, चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे विविध धाटणीचे चित्रपट, वेब सीरिज यांच्या चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..


 


Shreyas Talpade : सलमान खान, अक्षय कुमारचे चित्रपट फ्लॉप का? श्रेयस तळपदेने म्हटले, लोक आता थकलेत...



Shreyas Talpade : सलमान खान (Salman Khan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यासारख्या दिग्गज बॉलिवूड कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकले नाहीत. सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' आणि 'टायगर 3'ला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तर अक्षयचे गेल्या दोन वर्षांत आलेले चित्रपटही बॅक टू बॅक फ्लॉप ठरले आहेत. आता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) सलमान आणि अक्षय सारख्या बड्या स्टार्सचे चित्रपट चालत नाहीत यावर प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट निर्माते आणि कलाकारांनी कोणत्या गोष्टींवर अधिक भर देण्याची गरज आहे हे देखील श्रेयसने सांगितले आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.. 


 


Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं मॅरेज रजिस्ट्रेशनवर सह्या केल्या? अखेर 'त्या' फोटो मागील गुढ उकललं


Prajakta Mali Actress Become Film Producer:  चित्रपट निर्मिती क्षेत्रात सहसा अभिनेते-अभिनेत्री येत नाहीत असे चित्र सिनेइंडस्ट्रीत एकेकाळी दिसायचे.  मात्र मागील काही काळापासून अभिनेते-अभिनेत्री  चित्रपट निर्मितीमध्ये उतरत आहेत. चतुरस्त्र अभिनेत्री प्राजक्ता माळीही (Prajakta Mali) आता सिनेनिर्मितीत उतरत आहे. गुरुवारी, प्राजक्ता माळीने काही कागदपत्रांवर सह्या करतानाचे फोटो शेअर केले होते. या फोटोचे गुपित आता उलगडले आहे. प्राजक्ता माळी निर्माती असलेल्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिहिलेल्या कांदबरीवर आधारीत चित्रपटाची घोषणा आज करण्यात आली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Border 2 Movie Updates : 'बॉर्डर 2' ची रिलीज डेट आली समोर; सनी देओलसोबत दिसणार हा स्टार अभिनेता


Border 2 Movie Updates Sunny Deol :  1997 मधील ब्लॉकबस्टर चित्रपट बॉर्डरने (Border) बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई  केली होती. 1971 मधील भारत-पाकिस्तान युद्धातील एका सत्य घटनेवर आधारीत असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. सनी देओल, सुनिल शेट्टी, अक्षय खन्ना यांच्यासह अनेक कलाकारांच्या यात भूमिका होत्या. मागील काही दिवसांपासून बॉर्डर-2 बद्दल चर्चा सुरू होती. आता, या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. बॉर्डर-2 चित्रपटात सन्नी देओलची (Sunny Deol) भूमिका असणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात आयुष्यमान खुरानादेखील (Ayushmann Khurrana) असणार आहे. हा चित्रपट कधी रिलीज होणार याची माहितीदेखील समोर आली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Abdu Rozik Marriage : खरंच अब्दु रोजिक लग्न करतोय? शिव ठाकरेने सत्य सांगितले, मी त्याच्यासोबत 30 मिनिटे...



Abdu Rozik Marriage :  बिग बॉस 16 मध्ये झळकलेला  गायक अब्दु रोजिक (Abdu Rozik ) याची मोठी फॅन फॉलोईंग आहे. बिग बॉसमध्ये झळकल्यानंतर अब्दुवर भारतीय प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. बिग बॉस शिवाय अब्दु रोजिक हा खतरो के खिलाडीमध्ये ही दिसला. वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहणारा अब्दु आत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अब्दुने आपल्या लग्नाची घोषणा केली आहे. त्याच्या या घोषणेने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. पण, काहींनी हा एखादा स्टंट असल्याची शंका व्यक्त केली. अब्दुचा खास मित्र असलेल्या शिव ठाकरेने (Shiv Thakare) अब्दुच्या लग्नाचे सत्य सांगितले आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Marathi Movie Updates Gabh Movie : फिल्म फेस्टिवल्स गाजवणारा रांगड्या मातीतला ‘गाभ’ प्रदर्शित होणार; महत्त्वाच्या विषयावर करणार भाष्य



Marathi Movie Updates Gabh Movie :  मराठी सिनेसृष्टीत कथा, आशय केंद्रस्थानी राहिला आहे. सर्वसामान्यांच्या जगण्याचा वेध घेणाऱ्या मराठी चित्रपटांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. वेगवेगळ्या चित्रपट  महोत्सवांतून  नावाजला  गेलेला ‘गाभ' (Gabh Marathi Movie) हा मराठी चित्रपट आता प्रदर्शनास सज्ज झाला आहे. या चित्रपटातून प्राणी आणि मानवाच्या भावबंधावर भाष्य करण्यात आले आहे. हा चित्रपट 21 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेता कैलास वाघमारे याची महत्त्वाची भूमिका आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..


 


Marathi Serial Update : 'झी मराठी'कडून रिमेक मालिकांचं सत्र? पुन्हा नव्या मालिकेची घोषणा; टीआरपीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी प्रयत्न सुरुच


Marathi Serial Update : सध्या कलर्स मराठी, स्टार प्रवाह या वाहिन्यांवर सध्या नव्या मालिकांचा सिलसिला सुरु आहे. त्यातच आता झी मराठीहीने (Zee Marathi) त्यांचा पुढचा डाव टाकलाय. स्टार प्रवाह वाहिनीवर शिवानी सुर्वे मुख्य भूमिकेत असलेली थोडं तुझं थोडं माझं ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतून शिवानी तब्बल 9 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतणार आहे. त्यातच कलर्स मराठीवरही अबीर गुलाल आणि अंतरपाट या दोन मालिका सुरु होणार आहेत. त्यातच आता झी मराठीहीने त्यांच्या पुन्हा एका नव्या मालिकेची घोषणा केलीये. 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका लवकरच झी मराठीवर सुरु होणार आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..