OTT Release This Week : ओटीटी प्लॅटफॉर्मवर या वीकेंडला (OTT Weekend Release) काही चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार आहे. यामध्ये मसालापट,अॅक्शनपट, क्राईम थ्रीलरचा समावेश असलेल्या वेब सीरिज, चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे विविध धाटणीचे चित्रपट, वेब सीरिज यांच्या चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 


योद्धा


सिद्धार्थ मल्होत्रा, राशी खन्ना आणि दिशा पटानी यांचा 'योद्धा' चित्रपट आता थिएटरनंतर ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता.


आवेशम


'पुष्पा: द राइज'मध्ये अल्लू अर्जुनच्या विरोधात खलनायकी भूमिका घेणारा अभिनेता फहद फासिल त्याचा नवीन चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहे. त्याचा मल्याळम ब्लॉकबस्टर चित्रपट 'आवेशम'हा ओटीटीवर पाहता येणार आहे. हा ॲक्शन-कॉमेडी चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात आशिष विद्यार्थी, मन्सूर अली खान आणि साजिन गोपू यांच्याही भूमिका आहेत.


मर्डर इन माहिम


'मर्डर इन माहीम' या वेबसिरीजची कथा पुस्तकातून घेतली आहे. आशुतोष राणा आणि विजय राज यांची ही फिजियोलॉजिकल क्राइम थ्रिलर वेब सिरीज जिओ सिनेमावर रिलीज झाली आहे. त्यामुळे क्राईम थ्रीलरपटाच्या चाहत्यांना एक चांगला पर्याय आहे.


अनदेखी सीझन 3


आशिष आर शुक्ला यांच्या 'अनदेखी'चा  तिसरा सीझन रिलीज झाला आहे. ही क्राईम थ्रिलर वेब सिरीज सोनी लिव्हवर रिलीज झाली आहे. त्याची कथा मनालीमध्ये घडलेल्या एका भयानक गुन्ह्याभोवती फिरते.  या सीरिजचे पहिले दोन सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, मराठी आणि बंगाली या भाषांमध्ये ही सीरिज रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये दिब्येंदु भट्टाचार्य, सूर्या शर्मा, हर्ष छाया, आंचल सिंह, अंकुर राठी आणि अभिषेक चौहान मुख्य भूमिकेत आहेत. 


8 एएम मेट्रो


झी 5 च्या या '8 एएम मेट्रो' या  चित्रपटाची कथा एक पुरुष आणि महिलेच्या भोवती फिरते. रेल्वे प्लॅटफॉर्मवर ओळख झाल्यानंतर हे चांगले मित्र होतात. 


रत्नम (Ratnam)


रत्नम हा तामिळ अॅक्शनपट आहे. हा चित्रपट  प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. 


द फायनल अटॅक ऑन वेम्ब्ले (The Final Attack on Wembley)


'द फायनल अटॅक ऑन वेम्ब्ले' ही सीरिज फुटबॉल मॅचवर आधारित आहे. 8 मे रोजी ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे.


इतर संबंधित बातमी :