Border 2 Movie Updates Sunny Deol :  1997 मधील ब्लॉकबस्टर चित्रपट बॉर्डरने (Border) बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई  केली होती. 1971 मधील भारत-पाकिस्तान युद्धातील एका सत्य घटनेवर आधारीत असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. सनी देओल, सुनिल शेट्टी, अक्षय खन्ना यांच्यासह अनेक कलाकारांच्या यात भूमिका होत्या. मागील काही दिवसांपासून बॉर्डर-2 बद्दल चर्चा सुरू होती. आता, या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. बॉर्डर-2 चित्रपटात सन्नी देओलची (Sunny Deol) भूमिका असणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात आयुष्यमान खुरानादेखील (Ayushmann Khurrana) असणार आहे. हा चित्रपट कधी रिलीज होणार याची माहितीदेखील समोर आली आहे.


कधी रिलीज होणार बॉर्डर-2


'बॉर्डर-2' ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.  टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार  भूषण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता हे 'बॉर्डर 2' चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. हा चित्रपट अनुराग सिंह दिग्दर्शित करणार आहे. हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित करण्याची योजना आखली आहे. आयुष्मान खुराना आणि सनी देओल हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र झळकणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 


'बॉर्डर 2'साठी  'गदर-2' फॉर्म्युला?


'पिंकविला'ने दिलेल्या वृत्तानुसार, सनी देओल पुन्हा मेजर कुलदीप सिंग चंदुरीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आयुष्मान भारतीय सशस्त्र दलातील अधिकाऱ्याच्या  भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजसाठी निर्मात्यांनी प्रजासत्ताक दिनाची निवड केली आहे. 'बॉर्डर 2'साठी देखील 'गदर 2'चा फॉर्म्युला निर्माते वापरत असल्याची चर्चा आहे. 'गदर 2' हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. 'बॉर्डर-2' हा चित्रपटही प्रजासत्ताक दिनाच्या खास दिवशी प्रदर्शित करून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्याचा विचार निर्मात्यांचा असावा. 


 






बॉलिवूडमधील आतापर्यंतचा मोठा युद्धपट!


'बॉर्डर 2' सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठा युद्धपट ठरणार आहे. सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या वृत्तानुसार 'बॉर्डर 2' च्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. एक स्क्रिप्टही तयार करण्यात आली असल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसात स्क्रिप्टवर निर्णय घेतला जाईल. 


इतर महत्त्वाची बातमी :