Shreyas Talpade : सलमान खान (Salman Khan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यासारख्या दिग्गज बॉलिवूड कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकले नाहीत. सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' आणि 'टायगर 3'ला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तर अक्षयचे गेल्या दोन वर्षांत आलेले चित्रपटही बॅक टू बॅक फ्लॉप ठरले आहेत. आता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) सलमान आणि अक्षय सारख्या बड्या स्टार्सचे चित्रपट चालत नाहीत यावर प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट निर्माते आणि कलाकारांनी कोणत्या गोष्टींवर अधिक भर देण्याची गरज आहे हे देखील श्रेयसने सांगितले आहे. 


श्रेयस तळपदे सध्या त्याच्या 'कर्तम भुगतम' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 17 मे रोजी  प्रदर्शित होणार आहे. बड्या स्टार्सच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो तेव्हा छोट्या चित्रपटांनाही प्रतिकूल काळ असल्याचे म्हटले जाते. श्रेयस तळपदेने सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत या प्रसंगाबद्दल सांगितले. त्याने सांगितले की, कितीही प्रमोशन केले तरी चित्रपट पाहायला जायचे की नाही याचा निर्णय प्रेक्षक आता ट्रेलर पाहुन घेत असतात.






श्रेयसने सांगितले, लोक आता... 


अभिनेता श्रेयस तळपदेने सलमान खान आणि अक्षय कुमारसारख्या बॉलिवूड स्टारचे चित्रपट तिकिटबारीवर चांगली कमाई करत नाहीत. त्यावर त्याने म्हटले की,  लोक आता थकले आहे. ट्रेलर पाहूनच लोक आता चित्रपटात काय असणार, याचा अंदाज लावतात. त्यामुळे ट्रेलर पाहूनच हा चित्रपट पाहायचा की नाही याचा निर्णय घेतात. 


सुपरस्टार आहेत तर सगळे चित्रपट नाही चालणार...


श्रेयसने सांगितले की, चित्रपटाचे कितीही प्रमोशन करा. थिएटरमध्ये जाणारा प्रेक्षक हा ट्रेलर पाहून चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतो. त्याशिवाय,  वर्ड-ऑफ-माउथ नंतर तो चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतो. एखादा कलाकार सुपरस्टार आहे तर त्याचे सगळेच चित्रपट चालावेत असे काही नाही. राजेश खन्ना यांचे चित्रपट ओळीने सुपरहिट झाले. एका कालावधीनंतर त्यांचे चित्रपट फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. त्यावेळी असे व्हायचे आणि आताही तसेच होणार. त्यामुळे आम्ही चांगले चित्रपट बनवले पाहिजे हे आमचं कर्तव्य आहे.