Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Satvya Mulichi Satavi Mulgi :  लवकरच अस्तिका तिच्या खऱ्या रुपात येणार, नेत्राच्या दिव्यशक्तीची पुन्हा एक नवी परीक्षा


 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेत लवकरच अस्तिका तिच्या मूळ रुपात येणार आहे. अस्तिका नाग असल्याचा संशय इंद्राणीला आला होता. त्यानंतर अस्तिकाचं नागरुप इंद्राणी आणि नेत्राच्या लक्षात आलं. आता नेत्री आणि इंद्राणी या दोघी मिळून अस्तिकाला तिच्या खऱ्या रुपात आणण्यात यशस्वी होणार का याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.  अस्तिका ही मूळ नाग असून तिचं हे स्वरुप नेत्रा आणि इंद्राणीच्या लक्षात आलं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Sridevi Death Anniversary : चेहऱ्यावर तेज अन् गोड असं स्मितहास्य, आईच्या आठवणीत लेक खूशीने शेअर केला जुना फोटो


 आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बॉलीवूडच्या चांदनीने अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केलं. श्रीदेवी यांचे चित्रपट असोत, अभिनय असो किंवा फॅशन सेन्स असो, या प्रत्येक गोष्टीची आजही प्रेक्षक वर्गामध्ये तितकीच चर्चा केली जाते. आईच्या आठवणीत श्रीदेवी यांच्या दोन्ही मुली त्यांचे फोटो शेअर करत असतात. श्रीदेवी (Sridevi Death Anniversary) यांचे आजच्याच दिवशी म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी निधन झाले होते. त्याच आठवणीत खुशीने आईसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Premachi Goshta : आदित्यचा आगाऊपणा! मुक्ताला पार्टीतून हकललं, सावनी आणि हर्षला झाला आनंद, आता सागर काय करणार?


 स्टार प्रवाह (Star Pravah) या वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेत सध्या आदित्यच्या बर्थडे पार्टीची धूम पाहायला मिळतेय. आदित्यने त्याच्या या पार्टीसाठी सागरला देखील बोलावलं आहे. आनंदात सागर सई आणि मुक्तासह आदित्यच्या बर्थडे पार्टीला पोहचतो. पार्टीत आल्या आल्या सावनी मुक्ताचा अपमान करते. त्यावेळी मुक्ता सावनीला चोख उत्तर देते. आदित्यच्या मनात सागर-मुक्ताबद्दल तिरस्कार आहे. सागर आणि मुक्ता आदित्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जातात. पण आदित्य त्यावर उद्धटपणे आणि आगाऊपणे प्रतिसाद देतो. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Akash Thosar Birthday : एका चित्रपटानं आयुष्य बदललं, आता थेट बॉलीवूडकरांच्या पंगतीत स्थान मिळालं, तरुणींचा क्रश असलेल्या आकाश ठोसरचा 'असा' आहे प्रवास


 सैराट (Sairat) चित्रपटातून नावारुपाला आलेल्या परश्याचा म्हणजेच आकाश ठोसरचा (Akash Thosar) आज वाढदिवस आहे.  पहिल्याच चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आकाश हा प्रकाशझोतात आला. 100 कोटींचा गल्ला कमवणारा मराठीतील हा पहिला चित्रपट ठरलाच पण आकाशच्या आयुष्यासाठी तो चित्रपट फार महत्त्वाचा ठरला. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटातून नव्या जोमाच्या पिढीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि त्यांच्या पदार्पणात एक दर्जेदार चित्रपटाचा भाग त्यांना होता आलं. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Amruta Subhash : आईने ते नाव लावायला सुरुवात केली, मोहन गोखलेंही त्याचं माधुर्य सांगितलं मग..., अभिनेत्रीने सांगितलं 'अमृता सुभाष' या नावामागचं कारण


 सिनेसृष्टीत काम करताना अनेक कलाकार त्यांच्या आईचं नाव लावतात, काही जण त्यांच्या आई वडिलांचं नाव आडनाव म्हणून वापरतात. ललित प्रभाकर (Lalit Prabhakar), सायली संजीव (Sayli Sanjeev), रसिका सुनील (Rasika Sunil) आणि अमृता सुभाष (Amruta Subhash) हे कलाकार त्यांचं आडनाव म्हणून त्यंच्या वडिलांचं नाव लावतात. अभिनेत्री अमृता सुभाष हीने तिच्या या आडवनाविषयी नुकतच एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं. सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये तिच्या आडनावाविषयी सांगितलं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Ideas Of India 2024: चित्रपट चालला नाही याचं दु:ख आहेच पण..., लाल सिंह चड्ढाच्या अपयशानंतर काय होती आमिर खानची प्रतिक्रिया?


 काही वर्षांपूर्वी आमिर खानचा (Amir Khan) लाल सिंग चड्ढा (Lal Singh Chaddha) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आमिरसह अभिनेत्री करिना कपूर खान ही त्याच्यासोबत मुख भूमिकेत होती. या चित्रपटाची कथा थोडी वेगळी होती, पण या चित्रपटला प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडता आली नाही. आमिर खानला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते. त्याला त्याच्या सिनेमाची गोष्ट आणि त्याचा अभिनय हा परिपूर्ण ठेवायचा असतो. पण आमिरचा हा चित्रपट मात्र काही अंशी नापास झाला. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा