नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024)  आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांची हातमिळवणी (Congress AAP Alliance)   केलीय. आप आणि काँग्रेसने एकत्र पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा केली. चार राज्यातलं जागावाटप जाहीर करण्यात आलं. त्यानुसार दिल्लीत चार जागांवर आप तर काँग्रेस तीन जागांवर लढणार आहे. काँग्रेस आणि  आप आघाडीची घोषणा करताना आपचे संदीप पाठक म्हणाले, आगामी लोकसभा निवडणूक आम्ही एकत्र लढणार आहे. आम्हाला विश्वास आहे जनता आमच्यासोबत असून आम्ही निवडणूत जिंकणार आहे.  

हरियाणात काँग्रेस कुरूक्षेत्रची जागा लढणार आहे. हरियाणात काँग्रेस 9 तर आप 1 जागा लढवेल तर गुजरातमध्ये भरूच आणि भावनगरची जागा आप लढणार आहे. गुजरातमध्ये काँग्रेस 24 तर आप  दोन जागांवर लढणार आहे. तर गोव्यात दोन्ही जागा काँग्रेस लढेल. पंजाबमध्ये आपची सत्ता आहे. मात्र तिथे आघाडी करण्यात आलेली नाही. पंजाबमध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळे लढणार आहे.

  हरियाणा दिल्ली  गुजरात  गोवा 
एकूण लोकसभा 10 07 26 02
काँग्रेस  09 04 24 02
आप 01 (कुरुक्षेत्र लोकसभा) 03 02 ((भावनगर +भरूच) 00

दिल्लीत कोणत्या जागा आप लढणार?

  • नवी दिल्ली
  • पूर्व दिल्ली
  • पश्चिम दिल्ली
  • दक्षिण दिल्ली
     
    या चार जागांवर आप लढणार आहे. 

दिल्लीत काँग्रेस कोणत्या जागावर लढणार?

  • चांदणी चौक
  • नॉर्थ ईस्ट 
  • नॉर्थ वेस्ट 

या तीन जागांवर काँग्रेस लढणार आहे. 

 

दिल्लीत भाजपचे सात खासदार

2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दिल्लीतील सातही जागा जिंकल्या होत्या. चांदणी चौक मतदार संघातून हर्षवर्धन, ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी, पूर्व दिल्लीतून गौतम गंभीर, नवी दिल्लीतून मीनाक्षी लेखी, उत्तर पश्चिम दिल्लीतून हंसराज हंस, पश्चिम दिल्लीतून प्रवेश वर्मा आणि दक्षिण दिल्लीतून रमेश बिधुरी हे खासदार विजयी झाले होते. 

आप आणि काँग्रेसला दिल्लीत एकाही जागेवर यश नाही

लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसला दिल्लीत एकाही जागेवर यश मिळाले नाही. त्यामुळे सध्या आप आणि काँग्रेसच्या युतीमुळे दिल्लीतील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तर भाजपने हे गठबंधन नाही तर ठगबंधन असल्याची टीका केली आहे.   

हे ही वाचा :

राहुल नार्वेकर लोकसभेच्या मैदानात, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडणार