Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेत लवकरच अस्तिका तिच्या मूळ रुपात येणार आहे. अस्तिका नाग असल्याचा संशय इंद्राणीला आला होता. त्यानंतर अस्तिकाचं नागरुप इंद्राणी आणि नेत्राच्या लक्षात आलं. आता नेत्री आणि इंद्राणी या दोघी मिळून अस्तिकाला तिच्या खऱ्या रुपात आणण्यात यशस्वी होणार का याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. अस्तिका ही मूळ नाग असून तिचं हे स्वरुप नेत्रा आणि इंद्राणीच्या लक्षात आलं आहे.
नेत्राने ज्या नागाचं वर्णन केलं होतं, तोच नाग आबांच्या स्वप्नात येत असल्याचं नेत्राला कळतं. त्यानंतर इंद्राणीला देखील अस्तिका नाग असल्याचा संशय येतो. त्यावरुन दोघी मिळून तिचं खरं स्वरुप बाहेर आणण्याचा प्रयत्न करतात. पण आता लवकरच अस्तिका नाग असल्याचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. अशाच नागाच्या काही खुणा नेत्रा आणि इंद्राणीला विरुचक म्हणजेच रुपालीच्या देखील शरीरावर पाहायला मिळतात. अस्तिकाच्या अंगावर कात दिसल्याने इंद्राणीला अस्तिकाचा संशय येतो. त्यावेळी अस्तिका हे मी बाहेर नाग पाहिला त्यामुळे ती कात माझ्या अंगाला लागली असणार असल्याचं सांगते.
नेत्राची युक्ती यशस्वी होणार?
इंद्राणी आणि नेत्रा पुढे कसं करायचं याविषयी चर्चा करत असतात. त्यावेळी अद्वैत देखील तिथे येतो. तुम्हाला खोलीत येताना रुपाली किंवा अस्तिकाने पाहिलं तर नाही ना असा प्रश्न विचारते. तेव्हा अद्वैत नाही असं सांगतो पण पुढे काय करायचं असंही तिला विचारतो. त्यावेळी नेत्री इंद्राणी आणि अद्वैतला गरुड देवाची आरती पाठ करायला सांगते. तसेच ती घरातल्या इतरांना देखील ती आरती पाठ करायला सांगते. माहित नाही पण मला असं वाटतंय की अस्तिका लवकरच तिच्या मूळ स्वरुपात येईल, असंही नेत्रा म्हणते. त्यामुळे आता अस्तिकाचं मूळ रुप कळल्यानंतर नेत्रा तिला कोणती शिक्षा देणार याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.