Bank Holiday News : बँकेचे व्यवहार करणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. मार्च महिन्यातील अनेक सण आहेत. यामुळं सणांच्या दिवशी बँकांना सुट्टी (Bank Holiday) राहणार आहे. मार्च  महिन्यात देशभरातील बँका 14 दिवस बंद राहणार आहेत. ज्यामध्ये 5 रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्ट्यांचाही समावेश आहे. होळीसोबतच मार्च महिन्यात महाशिवरात्री आणि गुड फ्रायडे यासारखे सणही आहेत. त्या दिवशी बँका बंद राहणार आहेत. 

सणांच्या दृष्टीने मार्च महिना खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात महाशिवरात्रीसोबतच होळीचा सणही खूप महत्त्वाचा आहे. दुसरीकडे, गुड फ्रायडे देखील या महिन्यात येतो. याचा अर्थ या तिन्ही सणांमध्ये संपूर्ण देशात बँका बंद राहतील. तसेच, काही राज्यांमध्ये होळीचा सण नंतरच्या तारखेलाही साजरा केला जातो. छप्पर कुट आणि बिहार दिनानिमित्त त्या राज्यांमध्ये आणि शहरांमधील बँकांना सुट्टी असणार आहे. याशिवाय यावेळी 5 रविवारही येत आहेत. दुसऱ्या आणि चौथ्या रविवारीही बँकांना सुट्टी असणार आहे. म्हणजेच मार्च महिन्यात देशभरातील बँकांना 14 दिवस सुट्या असणार आहेत.

देशात कोणत्या दिवशी बँकांना सुट्ट्या असणार? 

देशात 14 दिवस बँका बंद राहणार आहेतचापचर कुटमुळे 1 मार्च रोजी मिझोराममधील आयझॉल शहरातील बँकांना सुट्टी असेल3 मार्च रविवार असल्यानं देशातील सर्व राज्यातील बँकांना सुट्टी असेल8 मार्च रोजी महाशिवरात्री असल्यानं देशातील सर्व राज्यातील बँकांना सुट्टी असेल9 मार्च हा दुसरा शनिवार असल्यानं देशातील सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल10 मार्च रविवार असल्याने देशातील सर्व राज्यातील बँकांना सुट्टी असेल17 मार्च रविवार असल्याने देशातील सर्व राज्यातील बँकांना सुट्टी असेल22 मार्च रोजी बिहार दिनानिमित्त बिहारमधील बँकांना सुट्टी असेल23 मार्चला चौथा शनिवार असल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल24 मार्च रविवार असल्याने देशातील सर्व राज्यातील बँकांना सुट्टी असेल25 मार्चला होळी म्हणजेच दुलहंडी म्हणजेच रंगीबेरंगी होळीनिमित्त देशातील बहुतांश राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेलभुवनेश्वर, इम्फाळ आणि पाटणा येथील बँकांना 26 मार्च रोजी याओसांग दुसरा दिवस आणि होळीनिमित्त सुट्टी असेल.27 मार्चला होळीनिमित्त बिहारमधील सर्व शहरांतील बँकांना सुट्टी असेल.गुड फ्रायडे निमित्त 29 मार्च रोजी देशभरात बँकांना सुट्टी असेल.31 मार्च रविवार असल्याने देशातील सर्व राज्यातील बँकांना सुट्टी असेल.

महत्वाच्या बातम्या:

CIBIl Score : बँकांचे कर्ज घेताना महत्त्वाचा असलेला सीबील स्कोर म्हणजे काय? तो कसा चेक करायचा?