Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...



Nana Patekar : 'त्या' सीनच्या वेळी अभिनेत्याची पँट खरंच ओली झाली... नाना पाटेकरांनी सांगितला तो किस्सा


Nana Patekar :  आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी सिनेसृष्टीत छाप सोडली आहे. नाना पाटेकर यांची भूमिका असलेल्या चित्रपटांचे आजही कौतुक सुरू असते. नाना पाटेकर यांनी दिग्दर्शित केलेला 'प्रहार' (Prahaar) चित्रपट आजही लोकप्रिय आहे. आपल्या दिग्दर्शनातील पदार्पणाच्या चित्रपटाच्या वेळी घडलेला एक किस्सा नाना पाटेकरांनी सांगितला. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


Marathi Serial : मराठी मालिकांचा आफ्रिकेत बोलबाला, पण 'तू तेव्हा तशी'चं डबिंग पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर; म्हणाले, 'आफ्रिकेच्या बायकांनाही...'


Marathi Serial :  मराठी मालिका (Marathi Serial) आणि प्रेक्षक वर्ग हे नातं फार जुनं आहे. आभाळमायापासून सुरु झालेला झी मराठी (Zee Marathi) प्रवास तर आता एका वेगळ्या उंचीवर येऊन पोहचला आहे. ती मालिका, त्यातली पात्र ही प्रेक्षकांना आपल्या घरातलीच वाटतात. त्यामुळे परदेशात राहणाऱ्या मराठी प्रेक्षकांसाठी देखील मराठी मालिका हा फार जिव्हाळ्याचा विषय असतो. पण आता ह्याच मालिकाही सातासमुद्रापार पोहचल्या असून तिथल्या प्रेक्षकांचंही मनोजरंजन त्यांच्या कळणाऱ्या भाषेत केलं जातंय. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


Kalki 2898 AD Review : व्हीएफएक्स वगैरे तांत्रिक बाजू दमदार पण कुठं फसला 'कल्की 2898 एडी'?


 Kalki 2898 AD Review in Marathi :  चित्रपट हा कोणासाठी तयार केला जातो? चित्रपट समीक्षकांसाठी? इतिहासकारांसाठी? पौराणिक गोष्टी समजाणाऱ्यांसाठी? या प्रश्नाचे उत्तर सगळ्यांना माहीत आहे, चित्रपट हा प्रेक्षकांसाठी तयार केला जातो. पण चित्रपट या प्रेक्षकांनाच समजला नाही तर?


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 



Kranti Redkar : 'तुला चित्रपट भेटत नाहीत का?' चाहत्याचा क्रांती रेडकरला सवाल, अभिनेत्री पहिल्यांदा व्याकरण सुधारलं अन् चोख उत्तर दिलं


Kranti Redkar :  अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) ही सोशल मीडियावर (Social Media) बरीच सक्रिय असते. त्यातच तिच्या मुलींचे रिल्स तर सोशल मीडियावर बरेच प्रसिद्ध आहे. अनेक मराठी सिनेमा आणि मालिकांमधून क्रांतीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. पण तिच्या मुलींच्या जन्मानंतर क्रांतीने सिनेसृष्टीतून काहीसा ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं. पण आता ती परत एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सक्रिय झाली आहे. याचा खुलासा स्वत: अभिनेत्रीनेच केला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Anant Ambani Radhika Merchant Wedding Invitation : सोन्याची मूर्ती, चांदीचं मंदिर..भक्ती आणि परंपरेचा मेळ, अनंत-राधिकाची लग्नपत्रिका पाहिली का?


Anant Ambani Radhika Merchant Wedding Invitation : रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Mechant) हे 12 जुलै रोजी विवाहबद्ध होणार आहेत. अनंत अंबानीने आपल्या विवाहाचे आमंत्रण स्वत: देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसापूर्वीच नीता अंबानी आपल्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण बाबा विश्वनाथ यांना देण्यासाठी काशीत आल्या होत्या. आता अनंत-राधिकाच्या लग्नपत्रिकेची एक झलकही समोर आली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


Marathi Movie Sharad Ponkshe : वडील-मुलाची 'ही' जोडी मराठी चित्रपटात, अभिनेते शरद पोंक्षे यांचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण


Marathi Movie Sharad Ponkshe:  बॉलिवूड प्रमाणे मराठी सिनेसृष्टीतही अभिनेत्यांच्या मुलांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. तर काही जण हे पडद्यामागे निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आता या यादीत आणखी एका कलाकाराचे नाव जोडले जाणार आहे. अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe)  यांचा मुलगा स्नेह पोंक्षे (Sneh Ponkshe)  आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. शरद पोंक्षे आणि स्नेह पोंक्षे ही वडील-मुलाची जोडगोळी 'बंजारा' या चित्रपटात एकत्र आली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...