Anant Ambani Radhika Merchant Wedding Invitation : रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Mechant) हे 12 जुलै रोजी विवाहबद्ध होणार आहेत. अनंत अंबानीने आपल्या विवाहाचे आमंत्रण स्वत: देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसापूर्वीच नीता अंबानी आपल्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण बाबा विश्वनाथ यांना देण्यासाठी काशीत आल्या होत्या. आता अनंत-राधिकाच्या लग्नपत्रिकेची एक झलकही समोर आली आहे.






अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाची पत्रिका


स्मृती राकेशने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. अनंत-राधिकाच्या लग्नाच्या कार्डमध्ये पाहुण्यांसाठी खास भेटही होती. रेड कलरच्या बॉक्समध्ये गणपती, राधा-कृष्ण आणि देवी दुर्गा यांच्या सोन्याच्या मूर्ती असलेले चांदीचे मंदिर होते. या लग्नाच्या आमंत्रणासोबत एक चांदीची पेटीही होती.


 


लग्नपत्रिका भक्ती आणि परंपरेच सुरेख संगम


अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची पत्रिका ही भक्ती आणि परंपरेने भरलेली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बॉक्स उघडताच चांदिचे मंदिर दिसते. या मंदिराच्या चार बाजूला चार देव विराजमान आहेत. एका बॉक्समध्ये लग्नपत्रिका असून त्यात विवाहासंबंधीची माहिती नमूद करण्यात आली आहे. त्याशिवाय आणखी एका बॉक्समध्ये देवांच्या सोन्याच्या लहान मूर्तीदेखील आहेत. 







ग्रँड प्री-वेडिंगनंतर पार पडणार विवाह सोहळा...


 


अनंत अंबनी आणि राधिका मर्चंट यांनी मागील वर्षी  साखरपुडा केला होता. तर मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगर येथे प्री-वेडिंग सोहळा पार पडला होता. या सोहळ्याला बॉलिवूड, हॉलिवूड ते राजकारण-उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. अनंत आणि राधिकाचे दुसरे प्री-वेडिंग फंक्शन 29 मे ते 2 जून दरम्यान क्रूझवर झाले. या सोहळ्यातही अनेक दिग्गज उपस्थित होते. या दोन ग्रँड सोहळ्यानंतर आता अनंत-राधिका 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :