Zee Marathi Paaru Serial Promo : पारूची अडचण सोडवण्यासाठी आलाय 'प्रेमवीर'; मालिकेत लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शकाची ग्रॅन्ड एन्ट्री; ओळखलं का कोण?
Zee Marathi Paaru Serial Promo : 'पारू' मालिकेत नेमका कोणता अभिनेता एन्ट्री घेणार याची प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर 'झी मराठी'नं या अभिनेत्याच्या एन्ट्रीचा पहिला प्रोमो शेअर करत प्रेक्षकांना सरप्राइज दिलं आहे.

Zee Marathi Paaru Serial Promo : 'झी मराठी'च्या अनेक मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात, त्यापैकीच एक मालिका म्हणजे, 'पारू'. सध्या या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे मालिकेचं कथानक एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. अशातच आता या मालिकेच आणखी एका नव्या आणि भन्नाट पात्राची एन्ट्री होणार आहे. मालिकेत एक प्रसिद्ध अभिनेता एन्ट्री घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
मालिकेत नेमका कोणता अभिनेता एन्ट्री घेणार याची प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर 'झी मराठी'नं या अभिनेत्याच्या एन्ट्रीचा पहिला प्रोमो शेअर करत प्रेक्षकांना सरप्राइज दिलं आहे. 'झी मराठी'नं मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये एक नवा अभिनेता मालिकेत एन्ट्री घेणार असल्याचं स्पष्ट होत आहे. मालिकेत अभिनेता आणि दिग्दर्शक ऋग्वेद फडके हटके अंदाजात एन्ट्री घेणार आहे.
View this post on Instagram
मालिकेच्या प्रोमोमध्ये काय दाखवलंय?
'पारू'मालिकेतील आदित्य, अनुष्का आणि पारू एकत्र बाहेर जात असतात आणि नेमका त्याचवेळी त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर होतो. अनुष्का आदित्यला विचारते, "काय झालं? तुला येतो ना टायर बदलता." त्यावर आदित्य म्हणतो, "आपण याची का काळजी करतोय, आपल्याबरोबर नोकर (पारू) आहेच की… बदलेल ती" अनुष्का विचारते, "पारूला जमेल टायर चेंज करायला?" आणि अनुष्का आणि आदित्य तिथून निघून जातात.
'पारू' गाडीचा टायर कसा बदलायचा? याच्या विचारात असते, इतक्यात एक हॉर्न तिला ऐकू येतो. तो हॉर्न गाडीचा नसून सायकलचा असतो, त्याच्या सायकलवर "प्रेमपुजारी आपलं कामभारी" अशी पाटी लावलेली असते. आता हा प्रेमवीर कोण? याचं उत्तर प्रेक्षकांना नव्या प्रोमोतून मिळालं आहे. हा प्रेमवीर दुसरा-तिसरा कोणीही नसून अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा ऋग्वेद फडके आहे.
'पारू'मालिकेत एन्ट्री घेणारा ऋग्वेद फडके कोण?
अभिनेता आणि दिग्दर्शक ऋग्वेद फडके यानं त्याच्या 'मुशाफिरी' नाटकामुळे एक वेगळी ओळख निर्माण केली. याशिवाय तो 'स्टार प्रवाह'च्या 'थोडं तुझं आणि थोडं माझं' या मालिकेत छायाच्या नवऱ्याची विनोदी भूमिका साकारतोय. अशातच आता तो 'पारू'मालिकेत वेगळ्या अंदाजात दिसून येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

