एक्स्प्लोर

'झी मराठी'च्या नव्या मालिकेसाठी 'कोकण हार्टेड गर्ल'ची महत्त्वाची भूमिका; होणाऱ्या नवऱ्यानं दाखवली पहिली झलक VIDEO

Ankita Walawalkar: 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकिता वालावलकरनं एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.

Ankita Walawalkar Writes Song For Zee Marathi Serial : बिग बॉस (Bigg Boss Marathi 5) फेम मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर ( Ankita Walawalkar)  नेहची आपल्या रिल्स आणि व्लॉग्समुळे चर्चेत असते. आता अशाच आणखी एका व्हिडीओमुळे अंकिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकिता वालावलकरनं एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. याची माहिती तिनं स्वतः सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत दिली आहे. 'झी मराठी'च्या नव्या मालिकेसाठी तिनं गाणं लिहिलं आहे. तसेच, या गाण्याची झलक अंकितानं तिच्या व्हिडीओमधून दाखवली आहे. 

अंकिता वालावलकर म्हणजेच, 'कोकण हार्टेड गर्ल'नं स्वतः 'झी मराठी'च्या नव्या मालिकेसाठी लिहिलेलं गाणं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत चाहत्यांना ऐकवलं आहे. 23 डिसेंबरपासून 'झी मराठी'वर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे, या मालिकेचं शीर्षक गीत अंकितानं लिहिलं आहे. हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांच्या मध्यवर्ती भूमिका असलेल्या 'लक्ष्मी निवास' मालिकेसाठी अंकितानं शीर्षक गीत लिहिलं आहे. या कौटुंबिक मालिकेची प्रेक्षक गेल्या काही महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. याच बहुचर्चित मालिकेसाठी अंकिताला प्रोमो गीत लिहिण्याची संधी मिळाली याचा आनंद असल्याचंही अंकिता व्हिडीओमध्ये म्हणाली. अंकिताच्या या पहिल्याच गाण्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

व्हिडीओमध्ये अंकिता म्हणाली की, "झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका तुमच्या भेटीला येतेय. या मालिकेचं नाव आहे लक्ष्मी निवास. यासाठी मी गाणं लिहिलंय… मी लिहिलेलं हे पहिलं गाणं हर्षवर्धन वावरे याने गायलं आहे आणि कुणाल-करण यांनी हे गाणं कंपोझ केलंय. लहानपणापासून मला गाण्याची आवड होती आणि या प्रोमोच्या निमित्ताने मी याची सुरुवात केलेली आहे."

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरनं लिहिलेल्या शीर्षक गीताच्या काही ओळी 

स्वप्न सारे पाहिले
घर आनंदाचे
आधार नात्यांना भासतो

दुःख भारी वाटते
स्वप्न थोडे अडखळते
वेळ संयमाची वाटते

घर हे दिसती चार भिंती जणू
पण ही भावनांची कुस वीणू

सावरु
स्वप्न पुन्हा पाहण्या
सुखाची या
गोष्ट पुन्हा लिहिण्या

बंध ते जे सुख बोलती
मखमली स्वप्नांचे लक्ष्मी निवास ते

अकिंतानं इंन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ :

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर झळकली होती. या सीझनची अंतिम फेरी अंकितानं गाठली होती. या पर्वाचा विजेता बारामतीचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण ठरला होता. बिग बॉसमुळे अंकिता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nana Patekar : 'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi: एका चुकीने सगळं गमावलं...; बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडला, 'हा' स्पर्धक संपूर्ण सिझनसाठी झाला नॉमिनेट
एका चुकीने सगळं गमावलं...; बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडला, 'हा' स्पर्धक संपूर्ण सिझनसाठी झाला नॉमिनेट
Mohini Colours Marathi Serial: 'मोहिनी'समोर येणार का जन्मदात्याचा क्रूर चेहरा? प्रतापरावांच्या भूमिकेत झळकणार 'हा' दिग्गज अभिनेता
'मोहिनी'समोर येणार का जन्मदात्याचा क्रूर चेहरा? प्रतापरावांच्या भूमिकेत झळकणार 'हा' दिग्गज अभिनेता
Shehar Phadke: प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोगर; वाढदिवसाच्या दिवशीच वडिलांनी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोगर; वाढदिवसाच्या दिवशीच वडिलांनी घेतला अखेरचा श्वास
Scam 1992 Breaks Ramayans Record: सत्य घटनेवर आधारित 'या' सीरिजनं मोडला 'रामायण'चा रेकॉर्ड; फक्त 5 एपिसोड पण, शेवटपर्यंत पापणीही पडू देत नाही, IMDb वर 9.2 ची रेटिंग
सत्य घटनेवर आधारित 'या' सीरिजनं मोडला 'रामायण'चा रेकॉर्ड; फक्त 5 एपिसोड पण, शेवटपर्यंत पापणीही पडू देत नाही, IMDb वर 9.2 ची रेटिंग

व्हिडीओ

Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report
Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report
Pune Cyber Scam : 54 कोटींच्या आमिषाला भुलले अन् 12 कोटी गमावले Special Report
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
GT vs DC IPL 2026 : डेव्हिड मिलरनं दिल्लीला विजयाजवळ पोहोचवलं पण एका निर्णयानं पराभवाचा झटका, गुजरातचा पहिला विजय
केएल राहुलचं अर्धशतक वाया, डेव्हिड मिलरचा एक निर्णय अन् दिल्लीचा पराभव, गुजरातचा रोमांचक लढतीत विजय
Iran : शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
Pune Cyber Fraud : शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget