एक्स्प्लोर

TMKOC : ‘तारक मेहता...’मध्ये ‘जेठालाल’ बदलणार? जाणून घ्या नेमकं सत्य काय...

TMKOC Update : आता सोशल मीडियावर अशी एक पोस्ट आली आहे, ज्यामध्ये तारक मेहता म्हणजेच ' जेठालाल'चे (Jethalal) पात्र साकारणारा अभिनेता बदलणार असल्याचे म्हणण्यात आले आहे.

Jethalal Replacement : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) हा प्रेक्षकांचा आवडता टीव्ही शो आहे. टीआरपीच्या शर्यतीतही या शोने टॉप 10मध्ये आपले स्थान कायम राखले आहे. या शोचे बहुतेक कलाकार गेल्या 14 वर्षांपासून या मालिकेशी संबंधित आहेत. पण, या शोमधील असे अनेक कलाकारही होते, ज्यांनी हा शो सोडला किंवा गेल्या काही वर्षांत त्यांची जागा इतरांनी घेतली.

आता सोशल मीडियावर अशी एक पोस्ट आली आहे, ज्यामध्ये तारक मेहता म्हणजेच 'जेठालाल'चे (Jethalal) पात्र साकारणारा अभिनेता बदलणार असल्याचे म्हणण्यात आले आहे. या शोचे अतिशय लोकप्रिय पात्र ‘जेठालाल’ साकारणारे दिलीप जोशी (Dilip Joshi) मालिकेतून बाहेर पडणार की काय, या विचाराने प्रेक्षकांना देखील धक्का बसला होता.

सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

या शोबद्दलच्या एका इन्स्टापेजने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये निर्माते असितकुमार मोदी सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर सौरभ घाडगेला ‘जेठलाल’च्या भूमिकेत घेणार असल्याचे म्हणण्यात आले आहे. टीव्ही जगतातील सर्वात जास्त काळ चालणारा शो ‘तारक मेहता’बद्दल केलेल्या या पोस्टमध्ये सौरभ घाडगे ‘जेठालाल’च्या पात्राला मागे टाकू शकतो, असे म्हटले होते. वास्तविक, पोस्ट सेन्सिबल टाईम्स नावाच्या एका इन्स्टा पेजवरून समोर आली होती, ज्यामध्ये मोठ्या अक्षरात ब्रेकिंग न्यूज असे लिहिले होते.

पाहा पोस्ट :

युट्युबरने सांगितले सत्य

यासोबतच ‘तारक मेहता..’ शोचे पोस्टर एका बाजूला, तर सौरभ घाडगेचा फोटो दुसऱ्या बाजूला होता. त्यात लिहिले होते की, तारक मेहतामध्ये जेठाऐवजी सौरभला घेण्याचा विचार निर्माते करत आहेत. अशा परिस्थितीत ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होऊ लागली. त्यानंतर ही बातमी यूट्यूबर सौरभपर्यंत पोहोचली. मात्र, सौरव घाडगे याने या वृत्ताचे स्पष्ट खंडन केले. शिवाय ही केवळ एक गंमत असल्याचे त्याने म्हटले आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा हिंदी टीव्ही इंडस्ट्रीचा सर्वात जास्त काळ चालणारा शो आहे. गेल्या 14 वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अशा परिस्थितीत या शोचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. दिलीप जोशी व्यतिरिक्त अमित भट्ट, शैलेश लोढा, मुनमुन दत्ता आणि इतर अनेक कलाकार या शोमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
'ठरलं तर मग' मालिकेत चक्रावणारं वळण; ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सायलीला होणार अटक, प्रोमो पाहून प्रेक्षकही चिंतेत
'ठरलं तर मग' मालिकेत चक्रावणारं वळण; ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सायलीला होणार अटक, प्रोमो पाहून प्रेक्षकही चिंतेत
Tejashree Pradhan On Veen Doghantli Hi Tutena Dialogue Free Episode: 'माईक नव्हते...', 'वीण दोघांतली ही तुटेना'चा 'नो डायलॉग' एपिसोड, तेजश्री प्रधाननं गृहिणींना सांगितलं, 'एका जागेवर बसून...'
'माईक नव्हते...', 'वीण दोघांतली ही तुटेना'चा 'नो डायलॉग' एपिसोड, तेजश्री प्रधाननं गृहिणींना सांगितलं, 'एका जागेवर बसून...'
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
NCP Bhagyashree Dhaygude Allegations Against Mangesh Jagtap Baramati: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या पक्षातील तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या पक्षातील तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
Embed widget