Aamhi Saare Khavayye : 'आम्ही सारे खवय्ये' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालनकाच्या भूमिकेत
Aamhi Saare Khavayye : 'आम्ही सारे खवय्ये' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Aamhi Saare Khavayye : 'आम्ही सारे खवय्ये' (Aamhi Saare Khavayye) हा लोकप्रिय कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाची प्रतीक्षा करत आहेत. आता घटस्थापनेपासून हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'आम्ही सारे खवय्ये' हा कार्यक्रम महिलावर्गाचा लाडका कार्यक्रम आहे. सुगरणींची मदत करणारा हा लोकप्रिय कार्यक्रम आता दोन वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घटस्थापनेपासून म्हणजेच 26 सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी 2.30 वा. हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'आम्ही सारे खवय्ये' या लाडक्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे सांभाळणार आहेत. यंदा कोल्हापूर पासून या पर्वाची सुरुवात होणार असून महाराष्ट्रातील गावागावात आणि शहरातील सोसायट्यांमध्ये 'आम्ही सारे खवय्ये' रंगणार आहे.
View this post on Instagram
'आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी' हे नव्या पर्वाचं नाव असून सासू सून, आई मुलगा, नवरा बायको अशा जोड्या जोडीने पाककृती बनवताना दिसणार आहेत. तर काही कलाकारदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार असून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. त्यामुळे यंदाच्या पर्वात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
'आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी' या नव्या पर्वाबद्दल संकर्षण म्हणाला,"आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होतोय. त्याबद्दल मी नक्कीच आनंदी आहे आणि उत्सुक आहे परत एकदा मला गृहिणींच्या घरी जाऊन त्यांनी बनवलेल्या पाककृतींची चव चाखता येणार आहे.
आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी
कधी पासून होणार सुरू? 26 सप्टेंबर
कुठे पाहू शकता? झी मराठी
किती वाजता? सोमवार ते शनिवार दुपारी 2.30 वा.
संबंधित बातम्या