Vicky Jain : अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता विकी जैन हे टीव्हीवरील सर्वांचे आवडते कपल आहे. अंकिता आणि विकी यांचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न झाले आहे. परंतु, आजही दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अंकिता आणि विकी सध्या स्मार्ट जोडी या शोमध्ये दिसत आहेत. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. दरम्यान, विकीने आता खुलासा केला आहे की, तो गेल्या दोन वर्षांपासून अंकिताच्या घरी घर जावई म्हणून राहत होता.


अंकिता आणि विकीने नुकतेच एका मुलाखतीत त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल आणि नवीन घराबद्दल सांगितले आहे. विकीने सांगितले की, "आम्ही नवीन फ्लॅट घेतला आहे. परंतु, त्याच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम कोरोनामुळे वेळेवर पूर्ण झाले नाही. त्यामुळे आम्ही नवीन घरात शिफ्ट होऊ शकत नाही. त्यामुळे मी अजूनही अंकिताच्या घरीच घर जावई म्हणून राहत आहे. मी जेव्हाही कधी मुंबईत येतो त्यावेळी अंकिताच्याच घरी राहतो."




"अंकिताला विचारले पाहिजे की तिला कसे वाटत आहे? कारण ती गेल्या दोन वर्षांपासून तिचे घर आणि कपाट माझ्यासोबत शेअर करत आहे, असे विकीने म्हटले आहे. विकीच्या या मजेशीर बोलण्यावर  अंकिता म्हणते, "मला वाटते की, जेव्हा आपण पती-पत्नी सारखे एकत्र राहू, त्यावेळी एक कपल म्हणून आपले जीवन सुरू होईल. मला माहीत आहे की, मी एक चांगली पत्नी होणार आहे आणि सर्व काही व्यवस्थित सांभाळणार आहे."  


महत्वाच्या बातम्या