Ananya Pandey : करण जोहरच्या पार्टीत ट्रांसपरेंट ड्रेसमध्ये पोहोचली अनन्या पांडे
अभिनेत्री अनन्या पांडे हिने फार कमी वेळात चाहत्यांच्या हृदयात एक खास ओळख निर्माण केली आहे. अनन्याचे चाहते तिचे चित्रपट आणि अभिनय पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. इतकंच नाही तर तिच्या प्रत्येक लूकचे चाहतेही वेडे होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी अनन्याची अतिशय सिझलिंग स्टाईल पाहायला मिळाली आहे. नुकतीच अनन्या एका पार्टीत असाच ड्रेस परिधान करून पोहोचली होती, जे पाहून सगळेच भारावून गेले. या ड्रेसमधील फोटो अनन्याने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अनन्यासह बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचले होते. या कार्यक्रमात प्रत्येकजण खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत होता.
मात्र जेव्हा अनन्याने पार्टीत एन्ट्री घेतली तेव्हा सगळे तिच्याकडे बघतच राहिले. या पार्टीत अनन्या पांडेने हाय थाई स्लिट शीअर ड्रेस परिधान करून पोहोचली.
अनन्याच्या या लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सगळ्याशिवाय ती इशान खट्टरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते.