Runway 34 Trailer: अजय देवगण (Ajay Devgn), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रकुलप्रीत सिंह (Rakul Preet Singh) यांचा आगामी चित्रपट 'रनवे 34' चा (Runway 34) ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटातील कलाकारांपासून ते निर्मात्यांपर्यंत सर्वांनी त्यांच्या सोशल अकाउंटवरून ट्रेलर रिलीजची माहिती शेअर करत प्रेक्षकांना सरप्राईज दिले आहे. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. त्याचबरोबर अजय देवगण यातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 29 एप्रिल 2022 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


ट्रेलरची सुरुवात अजय देवगणच्या फ्लाईट प्रवासाने होते आणि त्याच्या वॉकआउटने संपते. ट्रेलरमध्ये अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह यांची पायलटची भूमिका खूपच प्रेक्षणीय आहे. दोघे पायलटच्या सीटवर बसून एकत्र विमान उडवत आहेत. परंतु, खराब हवामानामुळे त्यांच्या विमानाचा तोल बिघडतो आणि ते अत्यंत वाईट कठीण परिस्थितीत त्यांना विमान उतरवावे लागते.


पाहा ट्रेलर :



'रनवे 34' ची कथा सत्य घटनांनी प्रेरित!


‘रनवे 34’ चित्रपटाची कथा जेट एअरवेजच्या दोहा कोची फ्लाइटच्या सत्य घटनेवरून प्रेरित आहे. ही घटना 2015ची आहे, जेव्हा खराब हवामान आणि अगदी कमी दृश्यमानता असूनही, विमानाच्या पायलटने अनेक अडचणींना न जुमानता विमान विमानतळावर उतरवले. असे म्हटले जाते की, ते एक प्रकारचे ब्लाईंड लँडिंग होते. या लँडिंगमध्ये सुमारे 150 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.


ट्रेलरमध्ये अजय देवगण कॅप्टन विक्रांत खन्नाच्या भूमिकेत दिसत आहे. नारायण वेदांत उर्फ ​​अमिताभ बच्चन या प्रकरणाच्या तळाशी जाऊन सत्य उघड करतात.


यूट्यूबर कॅरी मिनाटीचा बॉलिवूड डेब्यू!


अजय देवगणच्या प्रोडक्शन हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अजय देवगण दिग्दर्शित या चित्रपटात प्रसिद्ध यूट्यूबर कॅरी मिनाटी अर्थात अजय नागर देखील आहे. हा त्याचा डेब्यू चित्रपट असणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अमिताभ बच्चन आणि रकुलप्रीत सिंह यांच्याशिवाय अंगिरा धर, बोमन इराणी आणि आकांक्षा सिंग देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 29 एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha