Urfi Javed : आई गं... बर्थडेच्या दिवशीच उर्फीला दुखापत, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...
Happy Birthday Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद हिला वाढदिवसाच्या दिवशीच दुखापत झाली आहे. उर्फीनं पोस्ट करत या दुखापतीबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.
Happy Birthday Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिला वाढदिवसाच्या दिवशीच दुखापत झाली आहे. फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असलेल्या उर्फी जावेदचा आज वाढदिवस आहे. उर्फी जावेद तिच्या फॅशन स्टाईलमुळे ओळखली जाते. मात्र उर्फी जावेदला दुखापत झाली आहे. उर्फीची हटके फॅशन स्टाईलचं यामागचं कारण ठरलं आहे. उर्फीनं इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत या दुखापतीबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. व्हिडीओ शेअर करत उर्फी आपल्याला दुखापत झाल्याचं सांगितलं आहे. व्हिडीओमध्ये तिच्या शरीरावरील व्रण दिसत आहेत.
उर्फी जावेदला तिची स्टाईलच महागात पडली आहे. उर्फीला सिक्विन ड्रेस (Sequin Dress) घालणं महागात पडलं आहे. उर्फी जावेदचा आज 25 वा वाढदिवस आहे. उर्फीचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन काही दिवस आधीपासूनचं चालू झालं होतं. बर्थडे पार्टीमध्ये उर्फी जावेदने सिक्विन ड्रेस (Sequin Dress) आणि सिक्विन हातमोजे (Sequin Gloves) घातले होते. हा वर्क असलेला ड्रेस आणि ग्लोव्ह्ज शरीराला टोचल्यामुळे उर्फीच्या शरीरावर ठिकठिकाणी व्रण उठले आहेत.
पोस्ट करत म्हणाली...
उर्फीने सोशल मीडियावर हॅपी बर्थडे टू मी असं म्हणत व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये उर्फीने सांगितलं आहे की, सिक्विन ड्रेस आणि ग्लव्जमुळे तिच्या संपूर्ण शरीरावर व्रण उठले आहेत. त्यामुळे तुम्हीही सिक्विन ड्रेस घालणार असाल, तर सांभाळून.
सिक्विन ड्रेसमधील उर्फीचा स्टायलीश लूक
वाढदिवसासाठी खास ड्रेस
उर्फी जावेद आज बर्थडे निमित्त खास आऊटफिटमध्ये दिसणार आहे. याबाबत उर्फीने आधीच सांगितलं होते. दररोज वेगवेगळ्या स्टाईलसाठी चर्चेत असणारी उर्फी बर्थडेच्या दिवशी कोणत्या स्टाईलमध्ये दिसणार यासाठी सगळेच उत्सुक आहेत. उर्फीचे आतापर्यंतचे लूक पाहता, उर्फीने नेहमीप्रमाणे तिच्या वेगळ्या स्टाईलमध्ये दिसेल एवढं नक्की.