Ramayana : राम सीतेचा रोल करून घराघरात पोहोचले अन् 'या' 5 टीव्ही स्टारचे अवघं आयुष्य बदलून गेलं
Actors Played Role of Sita Ram : रामायणावर आधारित अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या मालिकेत राम-सीताची भूमिका साकारणारे कलाकारही लोकप्रिय झाले आहेत.
Tv Actors Played Role of Sita - Ram : अयोध्येतील (Ayodhya) प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा देशभर जल्लोष पाहायला मिळत आहे. रामायणावर आधारित अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या मालिकेत राम-सीताची भूमिका साकारणारे कलाकारही लोकप्रिय झाले आहेत. प्राण प्रतिष्ठा सोहळ्याआधी 'रामायण' मालिकेत राम, सीता आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहरी हे कलाकार अयोध्येला पोहोचले आहेत.
राम मंदिराच्या उद्घाटनाचा देशभर जल्लोष पाहायला मिळत आहे. रामानंद सागर यांच्या रामायणासह अनेक मालिका रामायणावर आधारित आहेत. या मालिकांमध्ये राम आणि सीताची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनादेखील चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
सुजय रेऊ आणि प्राची बंसल
'श्रीमद् रामायण' या मालिकेत सुजय रेऊने प्रभू रामाची भूमिका साकारली होती. तर प्राची बंसलने सीताची भूमिका वठवली होती. सुजय आणि प्राची यांचे काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. सोशल मीडियावरही ते चर्चेत आहेत.
अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया
रामानंद सागर यांचे 'रामायण' 1987 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या मालिकेत अरुण गोविल यांनी रामाची तर दीपिका चिखलिया यांनी सीताची भूमिका साकारली होती. आजही त्यांच्या कामाचं प्रेक्षकांकडून कौतुक होतं. अरुण आणि दीपिकाला पाहून लोकांना ते खरचं राम-सीता आहेत, असं वाटायचं.
गुरमीत चौधरी आणि देबीना बनर्जी
रामानंद सागर यांचा मुलगा आनंद सागरनेही 'रामायण' नामक मालिका बनवली होती. 2008 मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत गुरमीत चौधरीने रामाची भूमिका साकारली होती. तर देबीना बनर्जीने सीता मातेची भूमिका वठवली होती. दोघांच्याही कामाचं प्रचंड कौतुक झालं.
आशीष शर्मा आणि मदिराक्षी मुंडले
निखिल शर्मा आणि धर्मेश शाह दिग्दर्शित 'सिया के राम' (Siya Ke Ram) ही मालिका 2015 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत आशीष शर्मा आणि मदिराक्षी मुंडले मदिराक्षी मुंडले मुख्य भूमिकेत आहेत. त्यांनी साकारलेली राम-सीताची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
गगन मलिक आणि नेहा सरगम
रामायणावर आधारित 'रामायण: सबके जीवन का आधार' ही मालिका 2012 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत गगन मलिक आणि नेहा सरगम यांनी राम-सीताची भूमिका साकारली होती.
प्राण प्रतिष्ठा मुहूर्त (Ram Mandir Pran Pratishtha 2024 Muhurat)
अयोध्येतील राम मंदिरासाठी जवळपास पाच शतकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल.
संबंधित बातम्या