एक्स्प्लोर

'तुला पाहत नाही रे!' विकिशाच्या लग्नानंतर टीआरपी घसरला

विकिशाचं लग्न उत्तम झालं म्हणून मागच्या आठवड्यात 'तुला पाहते रे' मालिकेला भरगच्च टीआरपी मिळाला आणि मालिका नंबर 1 ला गेली. पण लग्नानंतर जे काही सुरु आहे, त्यामुळे हा टीआरपी घसरला आणि मालिका तिसऱ्या नंबरवर आली.

मुंबई : विकिशा अर्थात विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांचा शाही विवाहसोहळा अंबानींच्या वर्ताण होता, हे 'तुला पाहते रे'चा चाहतावर्ग मान्य करेल. पण ही लगीनघाई मालिकेला आणि पर्यायाने 'झी मराठी'ला भोवली की काय, असा प्रश्न आता पडत आहे. कारण लग्नानंतर घडणाऱ्या घडामोडींमुळे मालिकेचा टीआरपी घसरला आहे. मिस्टर अँड मिसेस सरंजामेंच्या आयुष्यात घडामोडी सुरु आहेतच, पण याचा परिणाम मालिकेच्या टीआरपीवर पडला आहे. लग्न उत्तम झालं म्हणून मागच्या आठवड्यात भरगच्च टीआरपी मिळाला आणि मालिका नंबर 1 ला गेली. पण लग्नानंतर जे काही सुरु आहे, त्यामुळे हा टीआरपी घसरला आणि मालिका तिसऱ्या नंबरवर आली. विक्रांतचा वैरी जालिंदर का कोण परत काय आला. इशाच्या बाबांनी लग्नाचा अर्धा खर्च द्यायचा म्हणून कोणालाही काहीच न कळवता घर काय विकलं आणि आता तर लिमिटच... सरंजामेंच्या घरात हळदीकुंकवाला गेलं असताना निमकरांनी हद्दच  केली. देण्यासाठी आणलेले पैसै चक्क हॉलमध्ये एका कोपऱ्यात हळूच लपवले. 'काय हा बालिशपणा!' 'काहीही काय दाखवतायत मालिकेत' ही रिअॅक्शन आहे मालिका बघणाऱ्या तमाम प्रेक्षकांची. त्याचाच परिणाम म्हणजे टीआरपी घसरला. खरं तर मालिकेच्या टायटल साँगमध्ये दिसणारी शिल्पा तुळसकर म्हणजेच विक्रांतची पहिली बायको राजनंदिनी सगळ्यांच्या कुतूहलाचा भाग आहे. आता लग्नानंतर तरी तिची चाहूल लागेल, असं वाटत असताना हे भलतंच प्रकरण सुरु झालं आहे. मालिकेत एखादा ट्रॅक प्रेक्षकांना आवडला, की तो वाढवला जातो. पर यहां तो उलटी गंगा बह रही है... आता लग्न झालं विक्रांत-इशाचं...म्हणजे आता त्यांच्या लव्ह स्टोरी मधला इंटरेस्ट कमी झालाय... आता राजनंदिनी आणि त्या बंद दरवाजाबद्दल प्रेक्षकांना जास्त रस आहे. झी मराठीच्याच मालिका पाहिल्या, तर होणार सून मी या घरची, राधा ही बावरी, लागिरं झालं जी... या सगळ्या मालिकांचा टीआरपी जोडप्यांच्या लग्नानंतर कमी झालेलाच दिसला आहे. आता काही अपवादही असतात, उदाहरणार्थ आपल्या राणादाची 'तुझ्यात जीव रंगला' मालिका. यावेळी दुसऱ्या नंबरवर हीच मालिका आली. देशात जसं इलेक्शनचं वातावरण आहे, अगदी तसंच मालिकेतही आहे. सांगण्याचा हेतू हाच की आता प्रेक्षकही चॉईस करायला शिकले आहेत. मालिका आवडते म्हणून वाट्टेल ते बघत बसण्यापेक्शा मालिकेतला विषय आवडेनासा झाला की मालिका चेंज किंवा चॅनेल चेंज... त्यामुळे निर्मात्यांनी वेळीच सावध झालेलं बरं!

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget