The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या शोमध्ये येऊन त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करतात. कपिल शर्मा (Kapil Sharma),कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek),भारती सिंह (Bharti Singh),किकू शारदा (Kiku Sharda)  हे कलाकार त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात.  अभिनेता अली असगर (Ali Asgar) देखील या शोमध्ये काम करत होता. पण त्यानं हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीमध्ये अलीनं द कपिल शर्मा शो सोडण्याचे कारण सांगितलं आहे. 


मुलाखतीमध्ये अलीनं सांगितलं, 'ही खूप वाईट परिस्थिती असते जेव्हा तुम्हाला दोन पर्यायांपैकी एकाची निवड करावी लागते. मी आज देखील त्या शोच्या स्टेजला मिस करतो. आम्ही एका टीम प्रमाणे काम केले होते.  पण एकदा अशी परिस्थिती निर्माण झाली जेव्हा मला हा शो सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. क्रिएट‍िव डिफरेंसेजमुळे मी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला कारण माझी या शोमधील भूमिका ही स्थिर झाली होती. शोमधील माझ्या कामामध्ये कोणतीच प्रगती करण्याची संधी मला मिळत नव्हाती. '






अभिनेता सलमान खान या शोचा निर्माता आहे. 23 एप्रिल  2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha