Abhishek Bachchan : सोशल मीडियावर अनेक नेटकरी कलाकारांना मिम शेअर करून ट्रोल करत असतात. कलाकारांच्या आऊट-फिटपासून ते त्यांच्या करिअरपर्यंत अनेक गोष्टींमुळे कलाकारांना ट्रोल केले जाते. काही कलाकार या ट्रोलर्सला उत्तर देतात. तर काही सेलिब्रिटी हे या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतात. एका नेटकऱ्यानं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून अभिनेता अभिषेक बच्चनला (Abhishek Bachchan) ट्रोल केलं. नेटकऱ्याच्या या पोस्टला कमेंट करून अभिषेकनं त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.
कोणत्याही चित्रपट दिग्दर्शकानं जर अभिषेकला चित्रपटाची ऑफर देण्यासाठी फोन केला तर त्यावर अभिषेकचा विश्वास बसत नाही, अशा आशयाचं ट्वीट एका नेटकऱ्यानं शेअर केलं होतं. त्या ट्वीटला अभिषेकनं रिप्लाय दिला, 'मला तुझा बायो खूप आवडतो. तु चांगलं काम कर.'
अभिषेकनं 2000 मध्ये रेफ्यूजी या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. धुम, युवा, बिग बुल, मनमर्जियां, दोस्ताना, गुरू, रावण, बोल बच्चन, बंटी और बबली या चित्रपटामधील अभिषेकच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अभिषेकचे काही चित्रपट हिट ठरले पण काही चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकले नाही. त्यामुळे त्याला अनेक वेळा नेटकरी सोशल मीडियावर ट्रोल करतात.
संबंधित बातम्या
- Kiran Mane : किरण मानेंनी फेसबुक पोस्ट शेअर करत केले नागराज आणि 'झुंड'चे कौतुक
- Shabaash Mithu : 'ती माझ्यासारख्या लाखो लोकांना प्रेरणा देते'; तापसी पन्नूने शेअर केले 'शाबास मिथू'चे नवे पोस्टर
- Baipan Bhari Deva : तुमच्या आमच्या घरातल्या सुपरवूमनची गोष्ट, केदार शिंदेंनी केली 'बाईपण भारी देवा' सिनेमाची घोषणा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha