Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकडे एकीकडे इंद्रा आणि दिपूची प्रेमकहाणी फुलत आहे. तर दुसरीकडे सानिका आणि कार्तिकमुळे त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. 


मालिकेत लवकरच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सानिका आणि कार्तिकने पळून जाऊन लग्न केले आहे. देशपांडे सरांना सानिका-कार्तिकच्या  लग्नाबाबत कळाले तर त्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे दिपू आणि इंद्राने सानिका-कार्तिकच्या लग्नाबाबत घरी सांगितलेले नाही. पण आता सानिका आई होणार असल्याने दिपू सानिका आणि कार्तिकच्या लग्नाचं सत्य घरच्यांना सांगणार आहे.





दिपू देशपांडे सरांची मुलगी असल्याचे सत्य अखेर इंद्राच्या आईला समजणार आहे. दुसरीकडे देशपांडे सर सानिकाच्या लग्नाची तयारी करत असल्याने त्यांना सानिकाच्या लग्नाबाबत समजल्यावर मोठा धक्का बसणार आहे. 'मन उडू उडू झालं' मालिकेत हृता दुर्गुळे दिपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत इंद्राचे पात्र साकारत आहे. 


संबंधित बातम्या


Majhi Tujhi Reshimgath : नेहाला भेटण्यासाठी यशची कसरत, दुधवाला बनुण जाणार घरी


Indian Idol Marathi : 'इंडियन आयडॉल मराठी'च्या मंचावर साजरा झाला महिला दिन विशेष खास कार्यक्रम


Ananya: आता महिला जे ठरवतील ते करुन दाखवतील, कारण 'अनन्या' येतेय; 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha