(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jui Gadkari : "सत्याचा विजय होणार अन् प्रेक्षकांची इच्छाही"; जुई गडकरीने दिली आगामी भागाची हिंट; जाणून घ्या 'ठरलं तर मग' मालिकेत सायलीची निवड कशी झाली?
Jui Gadkari : 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) या टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मालिकेत जुई गडकरी मुख्य भूमिकेत आहे. मालिकेच्या आगामी भागात सत्याचा विजय झालेला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Jui Gadkari : 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) या महाराष्ट्राच्या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या माध्यमातून तिने साकारलेली सायली घराघरांत पोहोचली आहे. टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मालिकेच्या आगामी भागांत लवकरच प्रेक्षकांना त्यांना हवं ते पाहायला मिळणार आहे. सत्याचा विजय होणार आणि प्रेक्षकांची इच्छाही पूर्ण होणार, असं म्हणत जुईने आगामी भागाची हिंट दिली आहे.
'ठरलं तर मग' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर का? (Tharala Tar Mag TRP)
'ठरलं तर मग' ही मालिका अनेक आठवड्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. विविध धाटणीच्या, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिकांना मागे टाकत जुईने टीआरपीचा गड कायम राखला आहे. एबीपी माझासोबत (Jui Gadkari on Tharala Tar Mag) याबद्दल बोलताना जुई म्हणाली,"ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षकांच्या प्रेमामुळे टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेची संपूर्ण टीम मनापासून मेहनत घेत आहे. मायबाप रसिक प्रेक्षकांचं मालिकेवर खूप प्रेम आहे. मालिकेच्या आगामी भागांत प्रेक्षकांना जे हवं आहे ते पाहायला मिळणार आहे. आता होळी जवळ येतेय आणि सत्याचा विजय होणार आहे आणि वाईटाला होळीत जाळून टाकणार. त्यामुळे एकंदरीतच प्रेक्षकांची इच्छा आता पूर्ण होणार आहे".
सायलीने जुई गडकरीला काय दिलं?
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना जुई म्हणते,"सायलीने जुई गडकरीला खूप काही दिलं आहे. ज्या गोष्टीची इतकी वर्षे मी वाट पाहिली त्या सर्व गोष्टी मला या पात्राने दिल्या आहेत. मी खूप नशीबवाण आहे की मी चांगल्या लोकांसोबत, चांगल्या वाहिनीवर काम करत आहे. उत्तम प्रोजेक्टचा मला भाग होता आलं आहे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण खूप प्रोजेक्टचं ऑडिशन देत असतो. पण कोणत्या गोष्टीसाठी आपलं सिलेक्शन होतं हे देवाच्या हातात असतं".
'ठरलं तर मग'साठी जुई गडकरीची निवड कशी झाली? (Tharala Tar Mag Jui gadkari Selection Process)
'ठरलं तर मग'च्या निवडप्रक्रियेबद्दल बोलताना जुई म्हणाली,"मी घरी पसारा आवरत होते. त्यावेळी मला स्टार प्रवाहच्या क्रिएटिव्ह हेड अंजली चास्करचा कॉल आला. ती म्हणाल्या, जुई तुला आवडेल का नवी मालिका करायला. तिला मी लगेचच होकार दिला. त्यानंतर तिने मला पटकन एक ऑडिशन द्यायला लावली. पुढे गडबडीतच मी एक ऑडिशन पाठवली. त्यानंतर दहा मिनिटात तिला कॉल आला की माझं सिलेक्शन झालं आहे".
जुई गडकरी लवकरच गाजवणार रुपेरी पडदा (Jui Gadkari on Movie)
जुई गडकरीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिका गाजवल्या आहेत. आता तिला रुपेरी पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. याबद्दल बोलताना जुई म्हणाली," रुपेरी पडद्यावर झळकण्याची माझी इच्छा आहे. मालिकेमुळे सध्या सिनेमाचं शूटिंग करणं जमत नाही. पण चांगल्या सिनेमासाठी विचारणा झाली तर नक्कीच मी विचार करेल. उत्तम कथानक असणाऱ्या सिनेमाची मी प्रतीक्षा करत आहे".
संबंधित बातम्या