Taarak Mehta Ka Ooltah Chashmah News: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेली 13 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. नुकताच या मालिकेतील एका एपिसोडचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओचे नाव यूट्यूबच्या टॉप 10 यादीत सामिल झाले आहे.
YouTube ने 2021 मधील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या टॉप 10 व्हिडिओंची यादी शेअर केली आहे. या यादीमध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील एका एपिसोडच्या व्हिडीओचे नाव सामिल झाले आहे. या एपिसोडमध्ये असे दाखण्यात आले आहे की, आत्माराम भिडे हे त्यांच्या सखाराम नावाच्या स्कूटरसाठी बाल्कनीमधून उडी मारतात. या एपिसोडचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या विशेष पसंती मिळाली आहे. या व्हिडीओला 10 कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. 9 जानेवारी रोजी हा एपिसोड प्रदर्शित झाला होता.
28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील सोढी ही भूमिका साकारणारा कलाकार गुरुचरण सिंह यांनी काही दिवसांपूर्वी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सोनु भिडेचे ही भूमिका साकारणारी झील मेहता आणि टप्पू ही भूमिका साकारणारा भव्य गांधी या कलाकरांनी देखाल मालिका सोडली.
हे ही वाचा :
Omicron : ओमिक्रॉन व्हेरियंटचा विकी-कतरिनाच्या लग्नाला फटका, घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय