Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Latest Updates : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेली 13 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. 28 जुलै 2008 रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. जाणून घेऊयात मालिकेत काम करण्यासाठी कलाकार एका एपिसोडचे किती मानधन घेतात.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत जेठालाला ही भूमिका साकारणारे अभिनेता दिलीप जोशी (Dilip Joshi)हे या मालिकेच्या एका एपिसोडसाठी 1.5 लाख रूपये मानधन घेतात. तर जेठालालच्या वडीलांची भूमिका साकारणारे अभिनेता अमित भट्ट एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 70 ते 80 हजार रूपये घेतात. मालिकेत तारक मेहता ही भूमिका साकारणारे अभिनेता शैलेश लोढा गोली कित्येक वर्ष या मालिकेमध्ये काम करत आहेत. शैलेश या मालिकेच्या एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 1 ते 1.5 लाख मानधन घेतात. मालिकेतील पोपटलाल ही भूमिका साकारणारे अभिनेता श्याम पाठक एका एपिसोडचे 60 हजार रूपये मानधन घेतात.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : जेठालालने घेतली आलिशान गाडी; किंमत ऐकून व्हाल थक्क!
मालिकेतील बबिता आणि अय्यर या जोडला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता एका एपिसोडचे 50 ते 70 हजार मानधन घेते. तर अय्यर ही भूमिका साकारणारे अभिनेता तनुज महाशब्दे एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 80 हजार ते एक लाख रूपये मानधन घेतात. तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील सोढी ही भूमिका साकारणारा कलाकार गुरुचरण सिंह यांनी काही दिवसांपूर्वी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सोनु भिडेचे ही भूमिका साकारणारी झील मेहता आणि टप्पू ही भूमिका साकारणारा भव्य गांधी या कलाकरांनी देखाल मालिका सोडली.