Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेली 14 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे दिशा वकानी (Disha Vakani) . दिशा यांनी काही वर्षांपूर्वी हा शो सोडला. सध्या दिशा या चर्चेत आहेत. दिशा यांना कॅन्सरची लागण झाली आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. आता मालिकेत जेठालाल ही भूमिका साकारणारे दिलीप जोशी आणि सुंदर ही भूमिका साकारणारा मयूर वकानी यांनी एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला मयूर वकानी?
'अशा अनेक अफवा येत असतात. यात तथ्य नाही. ती निरोगी आणि आनंदी आहे. जी चर्चा सुरु आहे ती खरी नाहीये. या अफवा आपण दररोज ऐकतो. त्याच्या चाहत्यांनी या गोष्टींवर विश्वास ठेवण्याची गरज नाही.' असं मयूर वकानी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं.
दिलीप जोशी यांनी दिली प्रतिक्रिया
दिलीप जोशी म्हणाले, 'मला सकाळपासून सतत फोन येत आहेत. वेळोवेळी काही ना काही मजेदार बातम्या येत असतात. मला वाटतं त्याचा प्रचार करण्याची गरज नाही. मी एवढेच म्हणेन की या सर्व अफवा आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.'
दिशा यांनी 2017 मध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाच वर्ष चाहते ती या शोमध्ये परत येण्याची वाट पाहात होते. पण दिशानं अजून शोमध्ये पुनरागमन केलेलं नाही.
28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. ‘देवदास’, ‘मंगल पांडे', ‘जोधा अकबर’, ‘लव्ह स्टोरी 2050’ या चित्रपटांमध्ये दिशाने काम केले आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: