Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरचा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा शो प्रेक्षकांमध्ये इतका लोकप्रिय झाला आहे की, लोक या शोला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग मानतात. या मालिकेतील बहुतेक पात्रे त्यांच्या खऱ्या नावांपेक्षा त्यांच्या पात्रांच्या नावाने ओळखली जातात. मात्र, गेल्या काही वर्षांत शोमधील काही कलाकारांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. कलाकारांनी मालिका सोडल्यानंतर काही कलाकारांच्या जागी नवे कलाकार आले, तर काही पात्र मात्र मालिकेतून वगळण्यात आली. यापैकीच एक पात्र होते ‘दया बेन’. या पात्राला प्रेक्षक खूप मिस करत असून, आता लवकरच ‘दया’ मालिकेत परतणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.


या मालिकेचे प्रेक्षक त्यांच्या लाडक्या ‘दया बेन’ची म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानीची वाट पाहत आहेत. दिशा बाळाच्या स्वागतासाठी ब्रेकवर गेली होती, त्यानंतर अद्याप ती शोमध्ये परतलेली नाही. पण, आता एका मीडिया रिपोर्टनुसार, शोचे निर्माते दिशा वकानीला नवरात्रीत या शोमध्ये परत आणू शकतात.


‘दया बेन’ पुन्हा परतणार!


दया ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दिशा वकानीने 2015मध्येच ‘तारक मेहता...’चा निरोप घेतला होता. ती या शोमधील प्रसिद्ध पात्रांपैकी एक होती. तिने आपल्या अभिनय क्षमता, मजेदार संवाद आणि गरबा नृत्याने प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले होते. मात्र, आता दिशा वाकानी शोमध्ये परतणार असून, ती पुन्हा दया बेनच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही.


निर्मात्यांचे प्रयत्न सुरु...


मीडिया रिपोर्टनुसार, दिशा वकानीला परत आणण्यासाठी निर्माते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. निर्मात्यांनी दिशाशीही संपर्क साधला आहे आणि शोच्या टीमची इच्छा आहे की, दिशाला कोणत्याही परिस्थितीत या मालिकेत पुन्हा आणायचे आहे. कारण, दिशा आता या मालिकेत परतली नाही, तर तिच्या जागी दुसरी एखादी अभिनेत्री शोधावी लागेल. परंतु, प्रेक्षक नवी दया बेन स्वीकारतील की नाही, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला ‘दया बेन’ला या शोमध्ये पुन्हा आणायचे, अशी निर्मात्यांची योजना आहे.


‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या शोमधील जेठालाल आणि दया यांच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. परंतु, 2015मध्ये दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानीने शोचा निरोप घेतला होता. त्यानंतर या व्यक्तिरेखेसाठी अजून नवीन अभिनेत्री मिळाली नाही. दिशा वकानीला परत आणण्यासाठी निर्माते सातत्याने प्रयत्न करत आहेत.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या 


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता’ची मालिकेत एन्ट्री होणार! शैलेश लोढा नाही तर ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका!


TMKOC : ‘आता जेठालाल बदलू नका! नाहीतर...’, जेठालालच्या अनुपस्थितीमुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे चाहते नाराज