Shailesh Lodha On Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दया बेन गोकुळधाममध्ये परतणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. अशातच आता शैलेश लोढाच्या (Shailesh Lodha) पोस्टने चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे. 


दिशा वकानीला (Disha Vakani) पुन्हा एकदा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत पाहता येणार असल्याने प्रेक्षक आनंदी झाले होते. पण आता शैलेश लोढाच्या सोशल मीडिया पोस्टने प्रेक्षकांना गोंधळात टाकलं आहे. पोस्टमुळे दया बेन परतणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 






शैलेश लोढा सोशल मीडियावक खूप अॅक्टिव्ह असतो. नेहमीच कोणत्या ना कोणत्या पोस्टने तो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो. आता शैलेशने पोस्ट केलेल्या कवितेचा संबंध थेट 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यासोबत जोडला जात आहे. 


शैलेश लोढाने लिहिलं आहे,"कोणाच्याही मनाशी जोडून घेण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. ही वस्तुस्थिती आहे. जी मंडळी त्यांना सोडून गेली त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही". शैलेश लोढाच्या या पोस्टने सर्वांनाच गोंधळात टाकलं आहे. त्यामुळे दयाबेन पुन्हा मालिकेत परतणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 


संबंधित बातम्या


TMKOC : नवरात्रीच्या माहोलात रंग भरण्यासाठी ‘दया बेन’ गोकुळधाममध्ये परतणार! मेकर्सची चर्चा अंतिम टप्प्यात


Happy Birthday Disha Vakani : ‘तारक मेहता..’मधून दिशा वकानीने मिळवली घराघरांत प्रसिद्धी, मनोरंजन विश्वातून दूर राहूनही कोटींमध्ये नेटवर्थ!