Bigg Boss 16 : नेहमीप्रमाणेच यंदाचा ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) वादात अडकला आहे. निर्माता-दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) याला स्पर्धक म्हणून घरात घेतल्याने या शोवर प्रचंड होत आहे. अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींवर लैंगिक शोषण केल्याचा अर्थात MeToo आरोप झाल्यानंतरही चित्रपट निर्माता साजिद खानला बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून कास्ट केल्याबद्दल आता अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) कलर्स चॅनल आणि सलमान खानवर (Salman Khan) संतापली आहे. शर्लिन चोप्रकडून या शोच्या मेकर्सना आणि सलमान खानला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.


या संदर्भात एबीपी न्यूजशी बोलताना शर्लिन चोप्राने सांगितले की, साजिद खानला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यासाठी तिच्या वकिलांनी 'एंडमॉल शाइन प्रायव्हेट इंडिया लिमिटेड' आणि बिग बॉस होस्ट करणाऱ्या सलमान खानला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.


साजिदला लवकरात लवकर बाहेर काढा!


शोची निर्मिती करणाऱ्या प्रोडक्शन कंपनीला आणि होस्ट सलमान खानला कायदेशीर नोटीस पाठवण्याव्यतिरिक्त, शर्लिंनने (Sherlyn Chopra) या नोटिसची एक प्रत राष्ट्रीय महिला आयोगाला देखील पाठवली आहे. आपण हे सगळं लोकप्रियता किंवा प्रसिद्धी मिळविण्यासाठी करत नसून, आपण या प्रकरणामुळे खूप दुखावलो गेलो आहे आणि आता बिग बॉसने साजिदला लवकरात लवकर घरातून हाकलून द्यावे, अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे.


... तर सलमान खानने साजिदला घेतले असते का?


या प्रकरणावर बोलताना शर्लिन म्हणाली की, 2005 मध्ये तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवस ती खूप अस्वस्थ होती, तेव्हा साजिद खानने चित्रपटाची ऑफर देण्याच्या बहाण्याने तिला त्याचा प्रायव्हेट पार्ट जबरदस्तीने दाखवला आणि तो हातात धरून उचलण्यासही सांगितला. साजिदला ‘बिग बॉस’च्या घरात घेतल्याबद्दल शर्लिनने (Sherlyn Chopra) शोचा होस्ट सलमान खानवरही नाराजी व्यक्त केली आणि म्हटलं की, लैंगिक शोषणाचे आरोप असणाऱ्या व्यक्तीला घरात घेण्याची काय गरज होती? अशा एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री निभावून तो आपल्यावरील डाग पुसण्याचा प्रयत्न करतोय का? जर साजिदने सलमानच्या बहिणीसोबत असे केले असते, तर त्याने साजिदला बिग बॉसच्या घरात घेतले असते का?, असे प्रश्नही तिने उपस्थित केले. सलमान खानने नकार दिला असता, तर साजिद आज ‘बिग बॉस’चा भाग झाला नसता.


‘त्यांना’ही ‘बिग बॉस’मध्ये बोलवा!


तर, साजिद खान याच्या बिग बॉस एन्ट्रीवर संतापलेल्या शर्लिन चोप्राने पुढे म्हटले की, तिला किंवा साजिदकडून लैंगिक शोषण झालेल्या मुलींना बिग बॉसच्या घरात का बोलावले जात नाही? असे घडायला हवे, जेणेकरून या मुलींना त्याला थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळेल. शर्लिन म्हणाली की, जर तिला बिग बॉसच्या घरात बोलावले गेले तर, ती नक्कीच आत जाऊन साजिदला त्याच्या कृत्यांसाठी थेट प्रश्न विचारेल. यावेळी शर्लिनला विचारण्यात आले की, ती साजिदविरुद्ध लैंगिक शोषणाशी संबंधित पोलिस केस देखील दाखल करणार आहे, तेव्हा तिने सांगितले की, ती तिच्या वकिलांशी सल्लामसलत करून निर्णय घेणार आहे.


हेही वाचा :


Bigg Boss 16 Update: 'वयाच्या 14व्या वर्षी रस्त्यावर टूथपेस्ट विकत होतो'; बिग बॉसमध्ये साजिद खाननं सांगितली स्ट्रगल स्टोरी